Ponda News : नवीन युवा कलाकार घडवणे हीच शिकांत नागेशकरांना श्रद्धांजली

सुदिन ढवळीकर ; नागेशीत शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली
Ponda News| Sudin Dhavalikar
Ponda News| Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda : ज्येष्ठ रंगकर्मी तथा नाटय दिग्दर्शक चित्रकार आणि मूर्तिकार शशिकांत नागेशकर यांनी कला क्षेत्रात नवनवीन योजना आणल्या, युवा कलाकार घडवले. मात्र, शशीमास्तर अर्ध्या वाटेवरूनच परत गेले. दिवंगत शशिकांत नागेशकर यांचे कलेच्या क्षेत्रातील योगदान फार मोठे असून नवनवीन युवकांनी सहभाग घ्यावा आणि या क्षेत्राचा विस्तार व्हावा, तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्‍गार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.

नागेशी - बांदोडा येथे पंचायत सभागृहात आज आयोजित दिवंगत रंगकर्मी शशिकांत नागेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. सुरवातीला सुदिन ढवळीकर व इतरानी शशिकांत नागेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. या शोकसभेला मोठी गर्दी झाली होती.

सुदिन ढवळीकर म्हणाले की, मगो पक्षासाठी शशिकांत नागेशकर यांनी मोठे काम केले, पण कसलाच हव्यास धरला नाही. राजकारणात असूनही कसल्याही उमेदवारीची आस बाळगली नाही. नाटय क्षेत्रात त्यांनी नवीन कलाकारांना घडवले, प्रेरणा दिली. त्यामुळे नाट्य कलेला उभारी मिळाली.

Ponda News| Sudin Dhavalikar
Goa News - घाट परिसरातील कोकणी लोकांशी कोकणी परिषदेने जोडले पाहिजे - दामोदर मावजो | Gomantak Tv

यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अजीत केरकर, श्रीधर कामत बांबोळकर, दिलीप ढवळीकर, एन. शिवदास, शशिकांत नाईक, अशोक नाईक, विघ्नेश नाईक व इतरांनी आपले विचार व्यक्त करून शशिकांत नागेशकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शशिकांत नागेशकर यांचे पंढरीच्या वारीत आकस्मिक निधन झाले होते. सूत्रसंचालन विजयेंद्र कवळेकर यांनी केले.

शशी मास्तरांच्या नावे नाट्य महोत्सव!

दिवगंत ज्येष्ठ रंगकर्मी शशिकांत नागेशकर यांच्या नावाने नागेशीतच भव्य नाट्य महोत्सव होणार आहे. त्यांच्या शिष्यांनी ही संकल्पना मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासमोर ठेवली आणि त्यांनी ती तात्काळ मान्य केली. शशी मास्तरांचा आदर्श जपा, असे आवाहन सुदिन ढवळीकर यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com