Agonda: 'ती' आग कुणी लावली? पंचायतीने प्रकरण दडपल्यामुळे आगोंदवासीय संतप्त; सरपंचांवरील अविश्वास ठरावानंतर घडली घटना

Agonda Panchayat Fire Incident: आगोंद पंचायतीच्या तत्कालीन सरपंचांवर मंगळवार दि.२८ रोजी अविश्वास ठरावावर चर्चा होऊन ठराव मंजूर झाला होता.
Agonda Panchayat Fire Incident
Agonda Panchayat Fire IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

Agonda Panchayat Fire News

आगोंद: आगोंद पंचायत कार्यालयाच्या एका महत्त्वाच्या खोलीत शुक्रवार,३१ जानेवारी रोजी, लावलेल्या आगीचे प्रकरण दडपण्यामागे कुठल्या शक्तींचा हात होता, तो सर्वांसमोर आलाच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आगोंदवासीयांनी केली आहे. लवकरच एक निवेदन स्थानिक आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

उपलब्ध माहितीनुसार शुक्रवार, ३१ रोजी, दु.३.३० च्या सुमारास पंचायत कार्यालयातील दस्तावेज व काही इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच इन्वर्हटर आदी ठेवलेल्या खोलीत कागद जळत असल्याची दुर्गंधी पंचायत लिपिक दीक्षा पागी यांना येताच पंचायतीत दुसऱ्या खोलीत उपस्थित सचिव व शिपाई यांना तसे सुचित केले.

तसेच सचिवांनी पोलीस यंत्रणेला सुचित केले. मात्र, पोलिस पोहचण्यापूर्वीच उपस्थित सर्वांनी उपलब्ध पाणी फवारून आग शमवली. तरी त्या ठिकाणी काही प्रमाणात जळालेल्या कुशन व फाईल्सना पेट्रोल या ज्वलनशील द्रव्याचा वास येत होता, अशी माहिती पंचायत सूत्रांकडून देण्यात आली.

काणकोण पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी निरीक्षण केले. कुणी तरी खुल्या असलेल्या खिडकीमधून पेट्रोल शिंपडून ही आग लावली, अशा निर्णयाप्रत आल्यावर काणकोण पोलिसांच्या सूचनेनुसार पंचायत सचिव अमोल नाईक गावकर यांनी त्वरित निवेदन सादर केले. या आग प्रकरणात ३ महत्वाच्या फाईल्स जळाल्या तर कुशन व काही वस्तू खराब झाल्या, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Agonda Panchayat Fire Incident
Illegal Constructions Agonda: आगोंदातील बेकायदेशीर बांधकामाविरोधात हायकोर्ट सख्त; रिपोर्ट सादर करण्याचे सरकारला आदेश; 57 जणांना नोटीस

आगोंद पंचायतीच्या तत्कालीन सरपंचांवर मंगळवार दि.२८ रोजी अविश्वास ठरावावर चर्चा होऊन ठराव मंजूर झाला होता. तसेच नवीन सरपंचपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर ही आग दुर्घटना घडली आहे.

काल गुरुवार, ५ रोजी, सरपंचपदी नीलेश पागी यांची निवड झाली. त्याआधीच हे आगप्रकरण घडले होते. इतकेच नव्हेतर पंचायत सदस्य व इतरांनीही याची कुठेही वाच्यता होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतल्यामुळे याठिकाणी तीव्र प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत.

Agonda Panchayat Fire Incident
Agonda Panchyat : आगोंद पंचायत क्षेत्रात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम संथगतीने

प्रकरण दडपण्यामागे नेमके कोण?

आग प्रकरण का दडपण्यात आले? तसेच याविषयी कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, काही नुकसान झाले असल्यास मागाहून‌ तक्रार नोंद केली जाईल‌, असे निवेदनात नमूद केले असल्याने काही तरी मोठे यामागे षड्‌यंत्र असावे, असे या भागात‌ बोलले जात आहे. या पंचायत इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यामुळे आगप्रकरणी कोण आहेत, हे संबंधितांनी गांभीर्याने घेतल्यास समजणे कठीण नव्हते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. नवनिर्वाचित सरपंच नीलेश पागी यांना संपर्क करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला तरी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com