Betul: महिला, माजी सरपंचांमध्ये खडाजंगी! बेतुल मोबाईल टॉवरचा विषय चिघळला; आगोंद ग्रामसभेत तणाव

Betul mobile tower issue: किनाऱ्याजवळचे पार्किंग व्यवस्था सुधारावी, शौचालय बांधकाम पूर्ण करावे या प्रश्नावर सरपंच म्हणाले की, स्थानिकांनी आपली जबाबदारी ओळखून वाहने पार्क करावीत.
Betul mobile tower issue
Betul mobile tower issueDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद: आगोंद ग्रामसभेत बेतूल येथेच आणखी एक १०० मीटर अंतरात मोबाईल टॉवर नको, याविषयावर बेतूल येथील महिला व एका माजी सरपंचांमध्ये खडाजंगी झाली. शेवटी सरपंच नीलेश पागी यांनी हस्तक्षेप केल्याने वाद निवळला.

शेवटी बहुमताने उपजिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदन देऊन मागणी करण्याचे ग्रामसभेत ठरले. मोकाट गुरांच्या प्रश्नावरही ग्रामसभेत चर्चेअंती कायम स्वरुपी तोडगा काढण्यात आला.

आगोंद पंचायतीची ग्रामसभा रविवारी रजनी पायक सभागृहात सरपंच नीलेश पागी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सात पंचसदस्य असलेल्या ग्रामसभेला उपसरपंच करुणा फळदेसाई, पंचसदस्य रामनाथ वेळीप, फातिमा रोड्रिगीस, जोन फेर्नाडिस, प्रिटल फेर्नाडिस, सचिव अमोल नाईक गावकर, तर निरिक्षक म्हणून सौ.नाईक गांवकर उपस्थित होत्या, तर पंचसदस्य केनिशा फेर्नांडिस अनुपस्थित होत्या.

मुडकूड येथील बंधारा बांधकाम लवकरच सुरू होईल. संपूर्ण अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण होईल, असे सरपंच पागी यांनी सांगितले.

किनाऱ्याजवळचे पार्किंग व्यवस्था सुधारावी, शौचालय बांधकाम पूर्ण करावे या प्रश्नावर सरपंच म्हणाले की, स्थानिकांनी आपली जबाबदारी ओळखून वाहने पार्क करावीत. ४० शौचालयांच्या ठेकेदाराला निर्वाणीचा इशारा दिला असून तो अर्धवट बांधकामे महिनाभरात पूर्ण करणार असल्याची हमी त्याने दिली आहे.

मार्कूस मिरांडा, नवनाथ नाईक गावकर, सुरज नाईक गांवकर, किसन देसाई, किरण नाईक गांवकर, जेनेट फेर्नांडिस, मेलोनी बार्रेटो, सिद्धेश बांदेकर, सिसिलियान फेर्नाडिस, फ्रेंकलिन फेर्नाडिस, मेल्वीन फेर्नाडिस, विनोद फळदेसाई व नारायण देसाई यानी भाग घेतला.

या सर्व प्रश्नी संबंधित अधिकारी व स्थानिक आमदार व मंत्री रमेश तवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक संयुक्त बैठक लवकरच घेऊन तोडगा काढण्यात येणार, आपण सर्वानी मात्र एकोपा राखुया, असे सरपंच पागी यानी स्पष्ट केले.

गुरे मीच सांभाळतो ः किसन देसाई

भटक्या गुरांना कर्नाटकातील एका खाजगी क॔पनीला देऊ नका, त्यापेक्षा जागा उपलब्ध केल्यास मीच त्यांचा सांभाळ करतो, असे स्थानिक गोरक्षक किसन देसाई यांनी सांगितले. यावेळी उपस्थित कोमुनिदाद संस्थेचे मुख्त्यार बादल नाईक गावकर यांनी आपण कोमुनिदाद संस्थेची जमीन देतो, असे सांगितल्यावर सर्व ग्रामस्थांनी जोरदार समर्थन करीत टाळ्या वाजवून त्या दोघांचेही अभिनंदन केले, सरपंच पागी यांनीही पंचायत आवश्यक मदत करेल, असे आश्वासन यावेळी दिले.

Betul mobile tower issue
Naquerim Betul: 'शिवरायांचा किल्ला नष्ट होईल, पर्यावरणाची वाट लागेल'! नाकेरी बेतुलवासीयांचा बंदराला ठाम विरोध; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

बाहेरचे टॅक्सीवाले नकोत!

गोवा माईल्सच्या अरेरावी वर बराचवेळ भाष्य करून टॅक्सी मालक ओनर्स संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश बांदेकर यानी काणकोण बाहेरील लोक स्थानिकांचा रोजगार हिरावून नेत असल्याचे प्रमाणासह सांगून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. आगोंद पंचायत क्षेत्रात परप्रांतीयांची संख्या दुर्लक्षून चालणार नाही. चोऱ्या, दरोडे यामुळे पोलिस गस्तीची मागणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com