Ponda News: आगियार यांचे फोंड्याच्या विकासात मोठे योगदान

समाजसेवक : धार्मिक सलोखा जपण्यात सहभाग
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak

Ponda News: फोंडा मतदारसंघाचे आमदार व गोवा राज्याचे माजी कृषीमंत्री ज्योईल्द सौझा आगियार यांचे बुधवारी (ता.15) सकाळी निधन झाले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असेच आहे.

विशेष म्हणजे फोंडा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. फोंड्यात धार्मिक सलोखा स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला व फोंडा पालिकेच्या निवडणुकीत 1970 मध्ये उमेदवारी दाखल केली आणि पहिल्यांदाच त्यांची नगरसेवक म्हणून निवड झाली. सुरवातीला फोंडा पालिकेचे नगरसेवक व नंतर पालिकेचे अध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

फोंडा पालिकेतील कार्यकाळात त्यांनी फोंडा मतदारसंघाच्या विकासाचे नियोजन केले. त्यात विविध रस्ते, प्राथमिक शाळा उभारणे, फोंड्यात क्रीडापटूंसाठी पहिले मैदान त्यांनीच उभारले. फोंड्यातील जवाहर क्लब तसेच जेसीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

फोंडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी 1980 मध्ये निवडणूक लढविली व ते जिंकून आले. गोवा सरकारात प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात कृषीमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. कृषी खात्याबरोबरच त्यांच्याकडे पर्यटन, पशुसंवर्धन तसेच समाजकल्याण अशी महत्त्वाची खाती होती.

विशेष म्हणजे समाज कल्याण खात्यात आमूलाग्र बदल करताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या, ज्या आजतागायत सुरू आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी नेली तसेच पुत्र मेल्विन व कन्या येला व इतर परिवार आहे.

Ponda News
Goa Crime: पारोडा खून प्रकरणी संशयिताला 48 तासांमध्ये अटक

एक कौटुंबिक नाते

ज्योईल्द आगियार हे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विकासाची कामे केलीच; पण धार्मिक सलोखा राखण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. आमचे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

ज्योईल्द आगियार हे खूप चांगले माणूस होते. फोंड्याच्या विकासासाठी त्यांनी चांगले योगदान दिले. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले. एक चांगला माणूस आमच्यातून हिरावला गेला.

- रवी नाईक, कृषीमंत्री, गोवा राज्य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com