Agarwada: रस्ता रुंद करू नका! आगरवाडा-चोपडे ग्रामस्थांची अजब मागणी; पंचायतीची स्थानिकांसमवेत बैठक

Agarwada Chopdem Road: रस्ता एमडीआर की ग्रामीण रस्ता हे सार्वजनिक बांधकाम खात्याने अगोदर स्पष्ट करावे व त्यानंतरच पुढील कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Agarwada Chopdem Villagers
Agarwada Chopdem RoadDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: आगरडा चोपडे पंचायत क्षेत्रातील रस्ता एमडीआर नसून ग्रामीण रस्ता आहे, त्यामुळे हा रस्ता आणखीन रुंद करण्याची गरज नाही, असा सूर आगरवाडा चोपडे पंचायतीने घेतलेल्या नागरिकांच्या बैठकीत व्यक्त झाला.

येथील रस्ता एमडीआर की ग्रामीण रस्ता हे सार्वजनिक बांधकाम खात्याने अगोदर स्पष्ट करावे व त्यानंतरच पुढील कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी प्रभारी सरपंच शिल्पा नाईक, पंच संगीता नाईक, भगीरथ गावकर, अँथनी फर्नांडिस तसेच पंचायतीचे कायदा सल्लागार ॲड. प्रसाद शहापूरकर उपस्थित होते. ॲड. शहापूरकर यांनी यांनी सुरवातीला उच्च न्यायालयाचा आदेशाबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली.

Agarwada Chopdem Villagers
Bhoma Road: ऐतिहासिक मंदिरांना हात लावू नका, रस्‍ता आराखड्यात बदल करा; भोम महामार्गाबाबत सरदेसाईंची मागणी

या आदेशानुसार आगरवाडा ते चोपडे दरम्यानच्या मुख्य रस्त्या शेजारील असलेल्या काही बांधकामांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.याबाबत कायदेशीर सल्ला तसेच पंचायतीची भूमिका लोकांना समजावण्यासाठी ही बैठक बोलावली होती. पंचायत मंडळाने यावेळी आपण लोकांसोबत असल्याचे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात आमदार जीत आरोलकर यांच्या समवेत बैठक घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

Agarwada Chopdem Villagers
Goa Belgaum Road: चोर्लाघाट-बेळगाव रस्त्याबाबत मोठी अपडेट; या मार्गावरुन प्रवास करण्यापूर्वी बातमी वाचा

नागरिकांत संभ्रम

आगरवाडा चोपडे- केरी तसेच पेडणे दरम्यानचा रस्ता हा एमडीआर रस्ता की ग्रामीण रस्ता याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. याबाबत ॲड. शहापूरकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तांत्रिक सल्लागारांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागवण्यात येईल, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com