Goa State Mourning: प्रकाशसिंग बादल यांच्या निधनानंतर गोव्यातही दोन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर

सर्व सरकारी इमारतींवरील तिरंगा ध्वज अर्ध्यावर फडकवणार
Goa State Mourning on death of Prakashsingh Badal
Goa State Mourning on death of Prakashsingh Badal Dainik Gomantak

Goa State Mourning : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. केंद्र सरकारने त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. त्यानंतर आता गोवा सरकारनेही राज्यात दोन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

Goa State Mourning on death of Prakashsingh Badal
Yuri Alemao: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली पहिल्या प्रेमाची कबुली; म्हणाले...

या दुखवटा काळात राज्यातील सर्व सरकारी इमारतींवर तिरंगा ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. तसेच या काळात सरकारतर्फे कोणत्यारही मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही.

बादल यांनी पाचवेळा पंजाबचे मुख्यमंत्रीपद भुषविले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्यावर मोहालीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी बादल यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com