Theft In Sanquelim: साखळीतही दोन फ्लॅट फोडले

Theft In Sanquelim: चोरांचा उपद्रव सुरूच : सुवर्णालंकारांसह सहा लाखांचा ऐवज पळविला
Goa Theft in goa
Goa Theft in goaDainik Gomantak
Published on
Updated on

Theft In Sanquelim: मडगावनंतर आता साखळीतही चोरट्यांनी एका रहिवासी इमारतीत धाडसी चोरी करून गोवा पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. बिनधास्तपणे एका चारचाकी कारमधून आलेल्या चोरट्यांनी साखळीतील एका इमारतीत घुसून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी एक फ्लॅट फोडला.

Goa Theft in goa
Goa Fraud News: अष्टगंधा पतसंस्थेत 8 कोटींचा घोटाळा!

या फ्लॅट मधून सुमारे 6 लाखांचा ऐवज त्यांनी पळविला असून त्यात सुवर्णलंकार व रोख रक्कमेचा समावेश आहे. ही घटना सकाळी 11.30 ते 12.20 या दरम्यान घडली. याप्रसंगी दोन्ही फ्लॅट बंद होते. या प्रकरणी वामनेश्वर रेसिडेंसी या इमारतीतील प्रेरणा प्रकाश पर्येकर यांनी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

Goa Theft in goa
Sunburn 2023 Goa: ‘सनबर्न’ला पर्यटनची अखेर सशर्त परवानगी

या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी पुढील लोखंडी गेट व दरवाजा तोडून प्रवेश केला व कपाटातील एक सोनसाखळी, दोन अंगठ्या, एक ब्रिसलेट, तीन कर्णफुलांचे जोड, दोन बांगड्या व एक मंगळसूत्र असे सुमारे 4.50 लाखांचे सुवर्णलंकार व 28 हजार रोख रक्कम लंपास केली.

बनावट क्रमांकाचा वापर ?

चोरीसाठी ज्या कारमधून चोरटे साखळीत आले होते त्या कारचा क्रमांक जीए 05 डी 8236 होता. तो काहींनी नोंद करून ठेवला होता. व सीसीटीव्ही केमेरातही बंदिस्त झाला होता. गाडीवरील सदर क्रमांकावरून पोलिसांनी तपासाला गती दिली.

या कारच्या मालकाला शोधण्याचा प्रयत्न केला असता सदर क्रमांकाची गाडी चोरी झालेल्या वेळी मूळ मालकांच्या घरीच होती, असे आढळून आले. त्यामुळे सदर गाडीला बनावट क्रमांक पट्टी बसवून हा चोरीचा प्रकार घडला आहे. हे सिध्द होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com