Bulbul Childrens International Film Festival Goa: 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) यशस्वी आयोजनानंतर आता गोव्यात बुलबुल चिल्ड्रन्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यात पाच दिवस हा महोत्सव होणार आहे. मडगावातील रविंद्र भवन येथे 9 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत हा महोत्सव होईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
माहिती व प्रसिद्धी विभाग आणि अंतरंग प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे. महोत्सवात चित्रपट प्रदर्शनाव्यतिरिक्त, विविध बाल-केंद्रित स्पर्धा, उपक्रम आणि मास्टर क्लासेस असणार आहेत.
या महोत्सवात 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय बालचित्रपट दाखवले जातील. उपस्थितांसाठी हा एक तल्लीन करणारा सिनेमॅटिक अनुभव असेल. विशेष म्हणजे, 10 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना महोत्सवात मोफत प्रवेश असणार आहे.
या महोत्सवासाठी 8 हजार मुलांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, दिगंबर कामत या महोत्सवाचे चेअरमन असतील. मडगावात अशा प्रकारचा महोत्सव पहिल्यांदाच होत आहे. 18 वर्षांवरील कुणाला यात सहभागी व्हायचे असेल तर त्यांच्यासाठी 2000 रूपये शुल्क असेल.
मुख्यमंत्री म्हणाले, 55 हून अधिक चित्रपट दाखवले जातील. स्पर्धात्मक विभागात 12 फिल्म्स असतील. 25 शॉर्ट फिल्म्स असतील. गेम झोन, आर्ट गॅलरी, क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटीही येथे होतील. बॉलीवूड डान्स स्पर्धा, ड्रोन मेकिंग वर्कशॉपही येथे होईल.
प्रसिद्ध कलावंतांचे मास्टरक्लास होतील. वेबसाईटवरून नोंदणी करता येईल. गोवा इफ्फीसाठी, मराठी फिल्म फेस्टिव्हलसाठी ओळखला जातो. लहान मुलांमधील सर्जनशीलता समोर येण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
आमदार कामत म्हणाले की, गोवा हे स्टेट ऑफ फेस्टिव्हल आहे. प्रथमच गोव्यात लहान मुलांसाठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी यासाठी पाठिंबा दर्शवला. फातोर्ड्याचे माजी आमदार दामोदर नाईक हे देखील या महोत्सवात सक्रीय आहेत. 8 ते 10 हजार जणांनी आधीच नोंदणी केली आहे.
पालकांसाठीही काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. रामायण, महाभारत अशा पद्धतीचेही चित्रपट असतील. मुलांवर संस्कार करणारे हे चित्रपट असतील. हा फेस्टिव्हल यशस्वी होईल, असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.