Zamgal Bridge: गोमंतक टीव्हीच्या वृत्ताची दखल! 3 दिवसात पूर्ण झाले जामगळ-नेत्रावळी पुलाचे काम; मात्र अद्याप...

जामगळ पुलाकडे जाणारा अजून एक पूल मात्र अद्याप दुर्लक्षितच
Zamgal Bridge PWD Work
Zamgal Bridge PWD WorkDainik Gomantak

Zamgal Bridge PWD Work: काही दिवसांपूर्वी जामगळ-नेत्रावळी पुलावरून पडून रमाकांत गावकर (50) यांचा मृत्यू झाला. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर सर्व स्तरातून टीका झाली. यानंतर गोमंतक टीव्हीच्या वृत्ताची दखल घेत विभागाने 3 दिवसात जामगळ पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. पुलाचा तुटलेला कठडाही दुरुस्त करण्यात आला आहे.

Zamgal Bridge PWD Work
Viresh Borkar: जामगाळ पुलाच्या कामावरून वीरेश बोरकर अॅक्शन मोडमध्ये! PWD अधिकाऱ्यांना घेराव

मात्र जामगळ पुलाकडे जाणारा अजून एक पूल मात्र अद्याप दुर्लक्षितच आहे. त्या पुलाची अवस्था अत्यंत वाईट असून जामगळ प्रमाणेच इथेही दुर्दैवी घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदर पूल जामगळ पुलापेक्षाही धोकादायक असल्याचे सांगण्यात येते.

या पुलाच्या कठड्याचे पाईप तुटले आहेत. संरक्षण भिंत नाही. तसेच पूल तीव्र वळणावर असून या रस्त्यावर फलक किंवा पथदिवे नसल्यामुळे इथून प्रवास करणे जिवावर बेतू शकते. त्यामुळे जर इथून जात असताना एखाद्याचा अंदाज चुकला, किंवा तोल जाऊन कुणाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने जामगाळ पुलाप्रमाणेच या ही पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com