Goa Congress Rebel: फुटिरांविरुद्ध संताप; आमदारांनी पक्षापेक्षा स्वतःच्या हिताचा विचार केला!

दक्षिण गोव्यात बैठक: पक्षाची तळापासून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय..
Amit patkar
Amit patkarDainik Gomantak
Published on
Updated on

Salcete: दक्षिण गोव्यातील प्रमुख कॉंग्रेस कार्यकर्त्यांची काल झालेल्या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या आठही आमदारांबद्दल संताप व्यक्त केला. दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार एल्टन डिकॉस्ता, जिल्हा अध्यक्ष सावियो डिसिल्वा, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नायक व अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

आठ आमदारांच्या बैठकीनंतर कॉंग्रेसची भूमिका विषद करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी ही बैठक बोलावल्याचे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत मोरेने रेबेलो व ओलेंसियो सिमोईश हेही उपस्थित होते.

Amit patkar
Digambar Kamat : मुख्यमंत्री गोव्यात परतले, दिगंबर मात्र दिल्लीतच का राहिले?

या बैठकीत पक्षाच्या पुढील धोरणावर चर्चा झाली व पक्षाची तळापासून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी युवक व महिलांना प्राधान्य देण्याचा निर्णय झाल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. आमदारांनी पक्ष सोडला ही कॉंग्रेससाठी लज्जास्पद गोष्ट नसून पक्षांतर केलेल्या आमदारांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

भाजप लोकशाहीचा खून करीत असून केवळ एका पक्षाचे सरकार ठेवून हुकूमशाही पद्धतीचा देशात अप्रत्यक्षरीत्या अवलंब करण्याचा हा मार्ग आहे. लोकांनी त्यासाठी सावध रहावे. दिगंबर कामत यांनीच देवदर्शनाला जाऊन शपथ घेण्याचा निर्णय घेतला होता व त्यांनीच स्वतः पक्ष सोडून देवाला धोका दिला, असेही फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

Amit patkar
Trinamool Congress: लुईझिन फालेरोंचा तृणमूलमधून काढता पाय!

अमित पाटकर यांचे स्पष्टीकरण: मी सर्व कार्यकर्त्यांची व गोवेकरांची माफी मागतो. पक्षांतर केलेल्या आठ आमदारांपैकी चारच मूळ कॉंग्रेसचे आहेत. लोबो पती-पत्नी, केदार नाईक व राजेश फळदेसाई हे भाजपवालेच. गोव्यात कॉंग्रेसची जास्त वर्षे सत्ता असूनही पक्षाची स्वतंत्र कचेरी का नाही? यापूर्वीच्या कॉंग्रेसच्या आमदारांनी पक्षापेक्षा स्वतःच्या हिताचा विचार केला. यापुढे विविध स्तरावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांची पक्षाबद्दलची निष्ठा पाहिली जाईल. पक्षाने विरोधी पक्षनेत्याची निवड केली नाही. कारण ज्याच्या नावाचा विचार चालू होता तो पक्षांतर करण्याची भीती होती आणि झालेही तसेच, ज्याच्या नावाचा विचार होता त्यानेच पक्ष सोडला, असे याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या सूचना-

* आठही आमदारांवर कठोर कारवाई व्हावी व यापूर्वी पक्ष सोडून गेलेल्यांना परत पक्षात प्रवेश देऊ नये

* प्रत्येक बुथच्या नियमीत बैठका घ्याव्या, उमेदवारी देताना कार्यकर्त्यांचा विचार व्हावा.

* गोवा जोडो कार्यक्रमाची आखणी करावी व पक्षात शिस्त आणावी.

* आगामी लोकसभेची तयार त्वरित सुरू करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com