Fake Indian Passport Case: दाबोळी विमानतळावर मोठी कारवाई! बनावट पासपोर्ट बाळगणारा अफगाणी नागरिक जेरबंद; दिल्लीत राहून भारतीय बनण्याचे रचले षडयंत्र

Afghan National Arrested Goa: बनावट भारतीय पासपोर्ट बाळगून विविध नावे धारण करत भारतीय प्रशासकीय यंत्रणांची फसवणूक करणाऱ्या दिगराज हिरो याला रविवारी (ता. १०) पहाटे दाबोळी विमानतळ पोलिसांनी अटक केली.
Fake Indian Passport Case
Afghan National Arrested GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: बनावट भारतीय पासपोर्ट बाळगून विविध नावे धारण करत भारतीय प्रशासकीय यंत्रणांची फसवणूक करणाऱ्या दिगराज हिरो याला रविवारी (ता. १०) पहाटे दाबोळी विमानतळ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी दाबोळी विमानतळावरील इमिग्रेशन ब्युरोचे विभागप्रमुख शनिगरम श्रीहर्ष यांनी दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा अफगाणिस्तानातील कंधार येथील, तर सध्या दिल्लीतील कैलाश येथे वास्तव्यास असलेला दिगराज हिरो हा रविवारी पहाटे दाबोळी विमानतळावरील काऊंटर क्रमांक १२ वर आला असता, तेथील इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. दिगराज हिरो याच्याकडे अफगाणिस्तानचा राष्ट्रीय पासपोर्ट होता. २००९ पासून त्याने अनेकदा भारतात ये-जा केली होती. त्यानंतर भारताबाहेर असताना त्याने आपल्या अफगाणिस्तानच्या पासपोर्टचे नूतनीकरण केले. जानेवारी २०१६ पासून तो पुन्हा भारतात ये-जा करू लागला होता.

Fake Indian Passport Case
Goa Traffic Police Office : वाहतूक कक्षात अखेर लागले दिवे, लोबोंची मध्यस्थी; थकीत बिलामुळे कळंगुट कक्ष चार-पाच दिवस अंधारात

रशियाहून बहरीनमार्गे गोव्यात आलेला दिगराज हिरो रविवारी पहाटे दाबोळी विमानतळावर पोहोचला असता, तो इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडला. भारतीय पासपोर्ट बाळगताना त्याने स्वतःची ओळख अनिल शुक्ला (रा. कैलाश, दिल्ली) अशी करून दिली होती. मात्र, त्याची बनावटगिरी उघडकीस आली. यापूर्वीही त्याने भारतीय पासपोर्ट बाळगला होता. त्यावेळी त्याने स्वतःची ओळख सुरेश आहुजा अशी भासविली होती. अशा प्रकारे त्याने अनेकदा भारतीय प्रशासकीय यंत्रणांची फसवणूक केली होती. याप्रकरणी दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकाचे प्रथमेश पालकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com