Goa Crime : मरड-म्हापसा येथे पडीक शेतात पुरलेल्या स्थितीत दीड वर्षीय बाळाचा मृतदेह आढळला. अग्निशमन दलाकडून येथील शेतात गवताला लागलेली आग विझविताना आज सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.
चौकशीअंती म्हापसा पोलिसांनी सांगितले, की फुगे व इतर साहित्य विकणारे मुंबईस्थित हे परप्रांतीय कुटूंब कार्निव्हलसाठी गोव्यात आले होते. म्हापसा बसस्टॅण्डच्या शेजारी झोपडपट्टीत ते राहत होते.
पाच दिवसांपूर्वी त्यांचा चिमुकला खोकला व सर्दीने मृत पावला. त्यावर या कुटुंबाने हा मृतदेह मरड येथील पडिक शेतात विधीवत पुरला होता. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह चिकित्सेसाठी पाठवला असून प्रथमदर्शनी काहीही संशयास्पद नसल्याचे सांगितले.
तोर्से डोंगरावर सापडला मानवी सांगाडा
पेडणे तोर्से येथे सरकारी हायस्कूलच्या मागे डोंगरावर आज एक मानवी हाडांचा सापळा सापडला. काजू बागायतीत गेलेल्या लोकांना हा सांगाडा दिसल्यावर त्याची माहिती त्यांनी मोपा पोलिसांना दिली.
तपासाअंती असे समजले, की हा सांगाडा अक्षय वल्लभ फाटक (25) याचा आहे. तो बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयानी 30 नोव्हेंबर 22 रोजी मोपा पोलिसांत दिली होती. बेरोजगारीमुळे उच्चशिक्षित अक्षय मानसिक नैराश्यात होता. सांगाड्याजवळ सापडलेल्या वस्तूच्या आधारे कुटुंबीयांनी ओळख पटवली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.