पणजी : राज्यातील फेरी जलमार्गांमध्ये सुधारणा करण्याच्या हेतुने नदी परिवहन खाते अग्रेसर असून, लवकरच दोन नवीन अत्याधुनिक फेरी बोट्स खात्याच्या ताफ्यात जोडल्या जाणार आहेत. एकूण 1.8 कोटी रुपये किंमत असलेल्या फेरी बोट्स यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत ताफ्यात जोडल्या जाणार असल्याची माहिती नदी परिवहन खात्याचे अधीक्षक विक्रम राजे भोसले यांनी दिली आहे.
नवीन फेरी बोट्स अत्याधुनिक असणार असून इतरांच्या तुलनेत त्या आकारात मोठ्या असणार आहेत. तसेच त्यांना डबल म्हणजे दोन इंजिन असल्याने, त्यामुळे त्यांची गती देखील जास्त असणार आहे. सामान्य फेरी बोट 6 ते 7 नॉट्सच्या वेगाना धावतात. परंतु, या 9 नॉट्सच्या वेगाने धावणार आहेत, असे राजे भोसले यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, फेरीचा रँप हा हायड्रॉलिक असणार असून यंत्राद्वारे हा वर आणि खाली केला जाईल. त्याशिवाय फेरीच्या कप्तानचे कॅबिन हे एअर कंडिशन्ड असणार आहे.
गोव्यात नदी परिवहन खात्याच्या ताफ्यात सध्या 35 फेरी बोट्स आहेत. त्यापैकी तीन फेरी बोट्स मोडीत काढल्यामुळे ताफ्यात 32 राहिल्या आहेत. मोडीत काढल्या फेरी बोट्स गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सुपूर्द केल्या जाईल. त्यांचा लिलाव किंवा व्हिलेवाट लावण्याची जबाबदारी महामंडळाची असणार आहे, अशी माहिती राजे भोसले यांनी दिली.
चोडण-रायबंदर जलमार्गारील फेरी बोटच्या रँपवर धोकादायक पद्धती पर्यटक बसलेले छायचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याची दखल घेत नदी परिवहवन खात्याने त्वरित कारवाई केली आहे. संबंधित कप्तानला खात्याने घडलेल्या प्रकारावरून स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच फेरीच्या कप्तानांना देखील असले प्रकार घडणार नाही याची खात्री करण्याची सूचना खात्याने केली आहे.
राज्यात 18 फेरी जलमार्ग असून यावर नेहमी फेरी सेवा सुरू असते. कुठल्याही जलमार्गावर आरोग्य संबंधित आपात्कालीन सेवेची आवश्यकता पडल्यास फेरी बोट तत्पर असतात. फेरीची आवश्यकता पडल्यास त्यांना त्वरित बोलावण्याची सुविधा लोकांना खात्याने दिली असल्याचंही भोसले यांनी स्पष्ट केलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.