पणजी : राज्यात जमीन बळकावण्याचे प्रकार विशेष तपास पथकाने केलेल्या कारवाईनंतर उघड झाले. परंतु अशा गुन्ह्यांची व्याप्ती केवळ एका तालुक्यापुरती मर्यादित नाही, तर ती सर्व राज्यात आहे.
जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्या तक्रारी तत्काळ नोंदल्या जात नाहीत, त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. विशेष तपास पथकाने (एसआयटी) जी कारवाई केली आहे, ती वरवरची कारवाई ठरू नये, तर त्यामागील हस्तकही पकडले गेले पाहिजेत. राजकारण्यांच्या वरदहस्ताशिवाय अशा जमीन बळकावण्याचे प्रकार घडू शकणार नाहीत, असे मत ॲड. क्लिओफात फर्नांडिस आणि ॲड. क्लिंटन फोन्सेका यांनी व्यक्त केले.
राज्यात सध्या जमीन बळकावण्याचे तियात्र घडल्याचे दिसत आहे. त्याअनुषंगाने दै. ‘गोमन्तक’चे संचालक संपादक राजू नायक यांनी ‘सडेतोड नायक’ या गोमन्तक टीव्हीवरील कार्यक्रमात जमीन बळकावण्याच्या घटनामागील काय कृष्णकृत्य घडतात, अशा प्रकारांत सरकारची भूमिका काय असावी, राजकारणी, पोलिस, वकील यांचा सहभाग असतो का? या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथक राज्य सरकारने नेमले आहे, या पथकाने कारवाई सुरू केली असल्या यापुढे काय होणार? या सर्व बाबींवर त्यांनी वरील कार्यक्रमात प्रकाश टाकला आहे.
ॲड. क्लिओफात सांगतात की, गोव्याची जमीन ही सुवर्णभूमी आहे, हे काही उगाच नाही. बार्देश तालुका हा सुट्टी घालविण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. त्यामुळे गोव्यात आपली मालमत्ता असावी, असे अनेकांना वाटते. त्यातूनच जमीन बळकावण्याचे प्रकार घडतात. अलीकडे जमिनीच्या मालकी हक्काविषयी प्रमुख पुरावे पुराभिलेख खात्याकडे असतात. त्यामुळेच तेथील अधिकाऱ्यांनी जमीन बळकावण्याप्रकरणी केलेले साह्य उघड झाले आहे. फसवणुकीच्या किंवा बनावटगिरीच्या घटना कशा घडतात. त्यामागे सर्वबाजूने संबंधित जमीन मालकावर दबाव आणला जातो, त्यासाठी अलिकडे बाऊन्सरचा वापर करण्यचे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे जमीन मालकाला जमीन द्यायची नसली तरी तडजोड करावी लागते.
ॲड. क्लिंटन सांगतात, जमीन बळकावल्याप्रकरणी एका जमीन मालकाची तक्रार म्हपासा पोलसांत देण्यासाठी गेलो. त्यांना पुराभिलेख कार्यालयातून आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करूनही आजमितीला पोलिसांनी त्याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतलेली नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. खरेतर तक्रार दाखल करण्याची जी पद्धत आहे, त्यात बदलाची गरज आहे.
राजकीय पक्ष गप्प का?
राज्य सरकारने जमीन बळकावल्याप्रकरणी विशेष पथक नेमल्यानंतर आता या प्रकरणांविरोधात तक्रारी होऊ लागल्या आहेत. जमीन विक्रीत एकही राजकीय व्यक्ती असू, नये याचे आश्चर्य वाटते. विशेष बाब म्हणजे याप्रकरणी एकही राजकारणी प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आलेला नाही. गोव्याच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन विधानसभा निवडणुकाला समोरे जाणाऱ्या स्थाननिक पक्षांतील आगही शमली की काय, असा सवाल ॲड. क्लिओफात फर्नांडिस आणि ॲड. क्लिंटन फोन्सेका यांनी केला.
उत्तर भारतीय, सेलिब्रिटींच्या मालमत्ता
उत्तर गोव्यातील जमिनी किंवा मालमत्ता खरेदी करणाऱ्यांमध्ये उत्तर भारतीय नागरिकांची, त्याचबरोबर सेलिब्रिटींचा अधिक समावेश आहे. उत्तर भारतीयांध्ये एकाने जमीन घेतली की, त्याच्याबरोबर आणकी काहीजण अशा मालमत्ता खरेदीसाठी गोव्याला पसंती देतात असे ॲड. क्लिंटन सांगतात. कोरोना काळात जमीन बळकावण्याची अधिकतर प्रकरणे घडली आहेत. कोरोना काळात अनेक लोक परदेशात राहिल्यानंतर ते गोव्यात लवकर परतले नाहीत. त्यामुळे बंद मालमत्तांच्या कागदपत्रांत फेरफार करून त्या मालमत्ता विक्री करण्याचे प्रकार बार्देश तालुक्यात घडले आहेत, असे ते सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.