MBBS Admissions in Goa: MBBS च्या कोर्समध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 200 जागा उपलब्ध
Goa Medical College Dainik Gomantak

MBBS Admission: MBBSच्या अतिरिक्त 20 जागांसाठी प्रवेश 'आजपासून' सुरु

MBBS Admissions in Goa: MBBS च्या कोर्समध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 200 जागा उपलब्ध
Published on

Panjim,Goa

पणजी: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (National Medical Commission) आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी MBBS कोर्सच्या पहिल्या वर्षासाठीच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

NEET परीक्षेच्या दुसऱ्या फेरीनंतर MBBS च्या कोर्समध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 200 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सप्टेंबर 16 ते 18 पर्यंत तांत्रिक शिक्षण संचालनालयामधून प्रवेश मिळवता येईल.

गोवा मेडिकल कॉलेज (GMC) मधून पूर्वी 180 जागा उपलब्ध करून दिल्या जायच्या, मात्र यंदाच्या वर्षी आणखीन 20 जागा जोडण्यात आल्या आहेत. पैकी 17 जागा खास गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील तर बाकी 3 जागांवर भारतातील इतर विद्यार्थी प्रवेश मिळवू शकतात.

नवीन जागा उपलब्ध करून दिल्यामुळे MBBS मध्ये प्रवेश मिळवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखीन एक संधी मिळेल. आयुर्वेद विभागाकडून देखील यंदाच्या वर्षी 100 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

MBBS Admissions in Goa: MBBS च्या कोर्समध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 200 जागा उपलब्ध
Goa Eco Sensitive Zone: ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ला ग्रामस्थांचा कडाडून विरोध; कुळे-शिगाव, मोलेत आक्षेप

याव्यतिरिक्त रेडिओडायगॉनॉसीस, गायनेकॉलॉजि, जनरल सर्जरी, फार्माकॉलॉजी आणि पीडियाट्रिक्स या विभागांकडून क्रमश: सहा,आठ,पंधरा, सहा आणि दहा अशा जागा वाढवण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com