Goa Eco Sensitive Zone: ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ला ग्रामस्थांचा कडाडून विरोध; कुळे-शिगाव, मोलेत आक्षेप

Goa Eco Sensitive Area: अनेक गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केला आहे; त्यातून वगळण्यासाठी ग्रामसभेत ठराव होत आहेत
Goa Eco Sensitive Area: अनेक गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केला आहे; त्यातून वगळण्यासाठी ग्रामसभेत ठराव होत आहेत
Goa VillageCanva
Published on
Updated on

कुळे: केंद्र सरकारच्या हवामान बदल खात्याकडून इको सेन्सिटिव्ह झोन या प्रस्तावित प्रस्तावात समाविष्ट केलेल्या गावांतील जमीनधारक व नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी बोलाविलेल्या कुळे-शिगाव पंचायतीच्या खास ग्रामसभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या सभेत कुळे-शिगाववासीयांनी कडक विरोध दर्शविला. कुळे-शिगाव इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात यावे, अशी मागणी करणारा ठराव एकमताने संमत झाला. केंद्रीय हवामान बदल खात्याने इको सेन्सिटिव्ह झोन मसुदा तयार केला आहे.

यामध्ये कुळे भागातील सर्व गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केला आहे. तसेच धारबांदोडा तालुक्यातील अनेक गावांचा समावेश केला आहे. मात्र, यात समावेश केलेल्या सर्व गावांमधून विरोध होताना दिसत आहे. यापूर्वी सुद्धा असाच विरोध झाला होता. मात्र, पुन्हा एकदा इको सेन्सिटिव्ह झोनचा मसुदा तयार करून तो येणाऱ्या काळात निश्चित करण्यात येणार आहे. धारबांदोडा तालुक्यातील ८० टक्के गावांचा यात समावेश आहे.

ग्रामस्थ, जमीनमालक यांची मते जाणून घेण्यासाठी पंचायत संचालकांनी विशेष ग्रामसभा बोलावून मते मांडण्याची मुभा पंचायतीला दिली होती. १२ सप्टेंबरपर्यंत या विशेष ग्रामसभा घेण्यात याव्यात, असे निर्देश दिले होते. ग्रामसभेत जो निर्णय होईल तो १७ सप्टेंबरपर्यंत संबंधित कार्यालयाला कळवायचा आहे. कुळे- शिगाव पंचायतीने १२ सप्टेंबरऐवजी १५ सप्टेंबरला विशेष ग्रामसभा बोलविली होती. या ग्रामसभेत इको सेन्सिटिव्ह झोनला कडाडून विरोध झाला.

कुळे शिगाव पंचायतीतर्फे घेण्यात आलेल्या ग्रामसभेला सरपंच गोविंद शिगावकर, उपसरपंच नेहा मडकईकर, पंच सदस्य बेनी आझावेदो, सदानंद बांदेकर, अनिकेत देसाई, साईश नाईक, सोनम दहीफोडे, आश्विनी नाईक देसाई तसेच क्लार्क प्रशांत देसाई यांची उपस्थिती होती.

सरपंच गोविंद शिगावकर यांनी स्वागत केले, तसेच इको सेन्सिटिव्ह झोनचा विषय ग्रामसभेसमोर ठेवला असता, त्याला उपस्थितांनी तीव्र विरोध केला.

Goa Eco Sensitive Area: अनेक गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केला आहे; त्यातून वगळण्यासाठी ग्रामसभेत ठराव होत आहेत
Goa Eco Sensitive Zone: आम्ही करायचे काय..? म्हाऊस ग्रामसभेत अतिसंवेदनशील क्षेत्राला विरोध

खाण कामगारांवर संकट

कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रात अनेक खनिज खाणी आहेत. या खाणींवर या भागातील अनेक लोक काम करीत आहेत, तसेच अनेक लोकांनी कर्ज काढून ट्र्क घेतले आहेत. इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यास या भागातील लोकांवर संकट येणार असल्याने या भागातून इको सेन्सिटिव्ह झोनला ग्रामस्थांकडून कडाडून विरोध दर्शविला जात आहे.

मोलेतही आक्षेप

मोले पंचायत यांनीही घेतलेल्या खास ग्रामसभेत इको सेन्सिटिव्ह झोनला कडाडून विरोध झाला असून इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येणारी गावे वगळावीत, अशी मागणी करणारे निवेदन आम्ही पाठविणार असल्याचे सरपंच वामन गावकर यांनी सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com