Goa Government: 'या' दिवशी होणार 'प्रशासन तुमच्या दारी' उपक्रम; जाणून घ्या कुठले मंत्री कुठे असणार...

सावंत सरकारच्या 4 तर मोदी सरकारच्या 9 वर्षपुर्तीनिमित्त आयोजन
Delay in Cabinet allocation in goa
Delay in Cabinet allocation in goaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: राज्यातील सावंत सरकारच्या 4 वर्षपुर्तीनिमित्त तर केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पुर्ण होत असल्याने राज्यात प्रशासन तुमच्या दारी हा उपक्रम आयोजित केला आहे. येत्या 17 आणि 18 मार्च रोजी हा उपक्रम असणार आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सनदी अधिकारी, मंत्री लोकांच्या तक्रारी, समस्या ऐकून घेतील आणि त्याचे निवारण करतील.

या दोन दिवशी राज्यातील सर्व 12 मंत्री राज्यातील विविध 12 ठिकाणी लोकांच्या समस्या ऐकणार आहेत. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, माझ्या सरकारला 19 मार्च रोजी 4 वर्षे पुर्ण होत आहेत.

गोव्यात भाजप सरकाराल 11 वर्षे झाली आहेत. तर केंद्रातील मोदी सरकारलाही 9 वर्षे पुर्ण होणार आहेत. त्यानिमित्त हा प्रशासन तुमच्या दारी उपक्रम होणार आहे. सर्व 12 मंत्री उपजिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी उपस्थित असतील. ते लोकांच्या समस्या, तक्रारी ऐकून त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील.

या ठिकाणी असणार मंत्री

केपे ------------- डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

सांगे------ मंत्री विश्वजीत राणे (आरोग्य, वन, महिला व बालविकास, शहरविकास, नगर नियोजन)

सत्तरी------------ मंत्री माविन गुदिन्हो (वाहतूक, उद्योग, पंचायत, प्रोटोकॉल)

पणजी----------- मंत्री रवी नाईक (कृषी, नागरी पुरवठा, हँडिक्राफ्ट)

काणकोण ------ मंत्री निलेश काब्राल (सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, कायदा)

पेडणे ------------- मंत्री सुभाष शिरोडकर (जलस्त्रोत, सहकार, प्रोव्हेडोरिया)

मडगाव ---------- मंत्री रोहन खंवटे (पर्यटन, आयटी, प्रिटिंग अँड स्टेशनरी)

मुरगाव ----------- मंत्री गोविंद गावडे (क्रीडा, कला आणि संस्कृती, ग्रामविकास)

फोंडा-------------- मंत्री बाबूश मोन्सेरात (महसूल, कामगार, वेस्ट मॅनेजमेंट)

म्हापसा----------- मंत्री सुदिन ढवळीकर (उर्जा, गृहनिर्माण)

धारबांदोडा ------ मंत्री नीळकंठ हळर्णकर (मत्स्य)

डिचोली---------- मंत्री सुभाष फळदेसाई (समाजकल्याण, नदी जल वाहतूक)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com