Goa Sports News: आदित्य काणकोणकरची सुवर्णझेप; भारतीय संघात निवड

Gold Medal in Judo: ज्युडो १०० किलो ग्रॅम वजनावरील गटात पटकावले सुवर्णपदक
Gold Medal in Judo: ज्युडो १०० किलो ग्रॅम वजनावरील गटात पटकावले सुवर्णपदक
Goa Judo Gold Goa News Hub, Canava

तिसऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ कझाक कुरेश अजिंक्यपद स्पर्धेत नागेशी- फोंडा येथील आदित्य काणकोणकर याने सुवर्णपदक पटकावले. १०० किलो ग्रॅम वजनावरील गटात त्याने ही कामगिरी केली. कझाक कुरेश असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ही स्पर्धा मोहाली - पंजाब येथे आयोजित करण्यात आली होती.

या कामगिरीची दखल घेऊन त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. कझाकिस्तान येथे होणाऱ्या आगामी जागतिक नोमाद गेम्स स्पर्धेत हा भारतीय संघ भाग घेणार आहे. यासाठी कझाकिस्तान येथे होणाऱ्या स्पर्धापूर्व शिबिरात तो भाग घेणार आहे.

Gold Medal in Judo: ज्युडो १०० किलो ग्रॅम वजनावरील गटात पटकावले सुवर्णपदक
katya Coelho won Gold Medal: राष्ट्रीय सेलिंग स्पर्धेत 'गोव्या'ला सुवर्ण पदक

गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. ज्युडोमध्ये त्याचा देशात सातवा क्रमांक आहे. बांदोडा ज्युडो केंद्राचे ज्युडो प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय कझाक कुरेश प्रशिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com