गोव्याच्या गणेशोत्सवात रमली अभिनेत्री समीरा रेड्डी; फोटो शेअर करत म्हणाली, 'ही नवी सुरुवात...'

Sameera Reddy Ganeshotsav Goa: अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या गोव्यात गणेशोत्सव साजरा करत आहे. ती सध्या तिच्या सासरी गोव्याच्या पारंपरिक गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात रममाण झाली आहे
actress sameera reddy ganpati photos
actress sameera reddy ganpati photosDainik Gomantak
Published on
Updated on

Sameera Reddy Ganesh Festival Goa: गणेश चतुर्थीचा सण हा केवळ लहानांसाठीच नव्हे, तर मोठ्यांसाठीही आनंद आणि जिव्हाळ्याचा असतो. याच उत्साहात अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या गोव्यात गणेशोत्सव साजरा करत आहे. ती सध्या तिच्या सासरी गोव्याच्या पारंपरिक गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात रममाण झाली आहे.

"नवीन सुरुवात करण्याची वेळ"

"या गणेशोत्सवात नवीन सुरुवात करण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची आणि त्याच्या समृद्धीने आपल्या सर्वांना तृप्त करण्याची वेळ आली आहे," असे म्हणत तिने सोशल मीडियावर गोव्यातील गणेश चतुर्थीचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

गोव्याच्या सणांची चाहती

२०१४ साली उद्योजक अक्षय वर्दे यांच्याशी विवाहबद्ध झालेली समीरा रेड्डी २०२० पासून गोव्यात स्थायिक झाली आहे. सध्या ती पणजीजवळच्या पर्वरी भागात राहते. अक्षय वर्दे हे मूळचे गोव्याचे आहेत. त्यामुळे समीराने देखील गोव्यालाच आपले घर मानले आहे. गोव्यातील या स्थलांतराचा तिच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाल्याचे ती अनेकदा सांगते.

actress sameera reddy ganpati photos
Sameera Reddy: खास खवय्यांसाठी समिरानं सुचवली म्हापशातील 'ही' 6 ठिकाणे

स्थानिक संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा अनुभव

समीरा रेड्डी सोशल मीडियावर गोव्यातील आपले अनुभव नेहमीच शेअर करत असते. यामध्ये ती गोव्यातील स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना तसेच येथील संस्कृती आणि सणांमध्ये सहभागी होताना दिसते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तिने शेअर केलेले फोटो गोव्याच्या पारंपरिक गणेशोत्सवाचे एक सुंदर दर्शन घडवतात. तिच्या चाहत्यांनीही तिच्या या पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com