Sameer Amunekar
प्रसिध्द अभिनेत्री समीरा रेड्डीने अलीकडेच गोवा टुर केली. या दरम्यान तिने खाद्यभ्रमंती करत खवय्यांसाठी म्हापशातील अनेक नवीन ठिकाणांची माहिती देणारी पोस्ट इंस्टाग्राम शेअर केली आहे.
समीराने मिक्स भाजी पाव, कांदा भजी आणि चहासाठी म्हापसामधील कॅफे कॅार्नर हे ठिकाण योग्य असल्याचं सांगितलं आहे.
फालूदा पेय हे थंड आणि गोड असते. फालूदा आणि स्नॅक्ससाठी कॅफे एसएफ झेवियरला तिनं पसंती दिली आहे. हे कॅफे खासत: विद्यार्थ्यांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी एक आवडते ठिकाण आहे
येथे पर्यटक आणि स्थानिक लोकांचे आवडते ठिकाण आहे. येथे किंगफिश थाळी आणि खरवसचा आनंद घेऊ शकता.
डॅा. शेक हे गोव्यातील एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे ठिकाण खासत: त्याच्या मिल्कशेक्स, स्मूदीज, आणि हेल्दी ड्रिंक्स साठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला चविष्ट आणि ताजे शेक्स आणि फॅन्सी ड्रिंक्स आवडत असतील, तर हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण ठरेल.
चमचमीत भरली ढोबळी मिरची आणि मसाला चहासाठी समीरा रेड्डीने एकनाथ स्टोर हे ठिकाण सुचवले आहे.
गोवा स्टाईल रोस ऑमलेटचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही संदेश चिकन सेंटरला भेट देवू शकता.