Pramod Sawant: मद्यपींना मुख्यमंत्र्यांनी भरला दम, साखळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

Prohibition Rules Goa: दारूच्या बाटल्या रस्त्यात टाकणं किंवा रस्त्यावर अशा बाटल्या फोडून काचा तयार करणं असे प्रकार साखळीतून वेळीच बंद झाले पाहिजेत
Prohibition Rules Goa: दारूच्या बाटल्या रस्त्यात टाकणं किंवा रस्त्यावर अशा बाटल्या फोडून काचा तयार करणं असे प्रकार साखळीतून वेळीच बंद झाले पाहिजेत
Pramod Sawant on Prohibition Rules Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: आजूबाजूला वाढणारा कचरा, वाईन आणि बियरच्या बाटल्या इथे-तिथे टाकण्याचे प्रकार, खुल्या जागेतील मद्यपान तसेच महिलांची छेड काढण्याचे प्रकार आणखीन सहन केले जाणार नाही असे थेट संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. दारूच्या बाटल्या रस्त्यात टाकणं किंवा रस्त्यावर अशा बाटल्या फोडून काचा तयार करणं असे प्रकार साखळीतून वेळीच बंद झाले पाहिजेत नाहीतर यावर कारवाई केली जाईल असा आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलाय. साखळी हाऊसिंग बोर्डमध्ये उभारलेल्या फुटसाल मैदानाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

साखळी नगरपालिकेला मिळालेला स्वछ नगरपालिकेचा पुरस्कार आपण कायम जपला पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आजूबाजूला कचरा फेकणाऱ्यांची तक्रार पोलिसांत दाखल करावी असा इशारा दिलाय.

Prohibition Rules Goa: दारूच्या बाटल्या रस्त्यात टाकणं किंवा रस्त्यावर अशा बाटल्या फोडून काचा तयार करणं असे प्रकार साखळीतून वेळीच बंद झाले पाहिजेत
Sanquelim Municipal Council: दर सोमवारी साखळी बाजारात वाहतूक बंद; नगरपरिषदेचा मोठा निर्णय

कचरा उघड्यावर फेकला जाऊ नये म्हणून भाडेपट्टीवर राहणाऱ्याकडून देखील कचरा कर घ्यावा आणि कोणीही रस्त्यावर कचरा फेकताना आढळल्यास त्याची पोलिसांकडे तक्रार व्हावी असं मुख्यमंत्री सावंत म्हणालेत.

साखळी नगरपालिका उत्तम काम करत आहे, त्यांनी हे काम असंच सुरु ठेवावं. प्रत्येक नगरसेवक त्यांच्या भागांमध्ये बजावत असलेल्या कामगिरीमुळेच आज साखळी उत्तम कामगिरी बजावत आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी साखळी नगरपालिकेचं कौतुक केलं आणि यासोबतच पालिकेने आवश्यक सेवा पुरवण्याला प्राधान्य द्यावे असे म्हणत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com