Rohan Khaunte: मिरामार किनाऱ्यावरील बेकायदेशीर बोटींवर कारवाई

बेकायदेशीर गाईड्सना दंड ठोठावणार : पर्यटन मंत्री रोहन खंवटे
Goa Tourism | Rohan khaunte
Goa Tourism | Rohan khaunteDainik Gomantak
Published on
Updated on

Rohan Khaunte: पर्यटन क्षेत्रातील बेकायदेशीर घडामोडींवर कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर आता गोव्याचे पयर्टन मंत्री रोहन खंवटे यांनी मिरामार किनाऱ्यावरील बेकायदेशीर बोटींवरही कारवाई केल्याचे सांगितले. येथील बेकायदेशीर गाईड्सना दंड ठोठावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Goa Tourism | Rohan khaunte
Goa Minister Fined Twice: भरधाव वेगाने गाडी चालवणं गोव्याच्या 'या' मंत्र्याला पडलं महागात

सरकारच्या जेटी धोरणाबाबतही त्यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, जेटी धोरणाबाबत काहीजण हे धोरण म्हणजे, कट कॉपी पेस्ट असल्याच्या तक्रारी येत आहेत. यातून जेटी धोरणाला विरोध करणाऱ्यांची मानसिकताही दिसून येत आहे. सांता मोनिका सारख्या पर्यटन स्थळांवरील अनागोंदी थांबविण्यासाठी जेटी धोरण आणण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यापुर्वी जेटी धोरणाबाबत बोलताना मंत्री खंवटे म्हणाले होते की, जेटी धोरण हे पर्यटनाशी संबंधित असेल. त्याचा वापर इतर कामासाठी केला जाणार नाही.

Goa Tourism | Rohan khaunte
Shripad Naik On Drugs: ड्रग्ज हेच गोव्यातील गुन्हेगारीमागचे प्रमुख कारण

सरकारने राज्यात जेटी धोरण मसुदा लोकांकडून सूचना व हरकतींसाठी खुला केल्यापासून त्याला जोरदार विरोध होत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेतही जेटी धोरण मुद्यावरून ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या धोरणाविरोधातील ठराव केला जात आहे. याबाबत बोलताना खंवटे म्हणाले की, ग्रामसभेतील निर्णयांची मला माहिती नाही.

जेटी धोरणावर सूचना व हरकती मांडण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. लोकांना 45 दिवसांची मुदत दिली आहे. लोकांना त्यांची मते मांडण्यासाठी तीन भाषांचा पर्याय आहे. या काळात लोकांनी मांडलेल्या मतांवर चर्चा केली जाईल. काही विरोधकही या जेटी धोरणाचा कोणताही अभ्यास न करता लोकांना चिथावत आहेत. राजकीय हेतुने काही लोक असे प्रकार करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com