Goa Updates: अन्न-औषध प्रशासनाकडून नियमभंगामुळे कारवाई

प्रमाण कायदा 2006 च्या कलम 69 खाली दंडात्मक कारवाई करण्यात आली.
food and drugs administration
food and drugs administrationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) खात्याकडे ग्राहकांकडून आलेल्या विविध नियमभंगाच्या तक्रारींच्या अनुषंगाने या खात्याने 24 व 25 मार्च रोजी पणजी कदंब बस स्थानक, केपे नगरपालिका परिसर, तिळामळ, कडचडे व काणकोण येथील खाद्य पदार्थांच्या आस्थापनांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली.

संबंधित आस्थापनांकडून त्यांच्याकडे विक्रीस ठेवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर तसेच ट्रेमध्ये ठेवल्या जाणाऱ्या पदार्थांवर ते बनविण्याची तारीख, ते कोणत्या तारखेपर्यंत वापरले जाऊ शकतात तसेच ते पदार्थ बनविणारी आस्थापने याविषयी माहिती दिली जात नाही अशा तक्रारी वरील खात्याकडे आल्यामुळे खात्याने दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती एका प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.

food and drugs administration
Goa Poetry Convention: 'कविता ही जीवनाला अर्थ देणारी परिभाषा'

या खात्याने 24 मार्च रोजी पणजी कदंब बसस्थानकावरील सुमारे 31 आस्थापनांची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यापैकी 12 आस्थापनांनी नियमांचे योग्य पालन न केल्यामुळे त्यांना अन्न सुरक्षा आणि प्रमाण कायदा 2006 च्या कलम 69 खाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच स्वच्छताविषयक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 4 आस्थापनांवर नोटीस बजावण्यात आली.

एफडीएने अशाच प्रकारची कारवाई केपे, तिळामळ आणि कुडचडे येथेही करण्यात आली. मिठाई दुकाने, बेकरी, पदपथांवरील खाद्य पदार्थ विक्री दुकाने अशा ठिकाणी एफडीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांची पाहणी केली. अशा सुमारे 30 दुकानांची पाहणी करण्यात आली. काणकोण बस स्थानकावरही या खात्याने पाहणी केली. खात्याच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये राजेश कोरडे, राजाराम पाटील, रिचर्ड नोरोन्हा यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com