FDA Raid in Vasco: वास्कोत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर छापेमारी; अनेकांचे धाबे दणाणले

अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी केली कारवाई
FDA Raid
FDA RaidDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: आज अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिकाऱ्यांनी वास्को परिसरातील अवैध अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या गाडे धारकांवर छापे टाकत कारवाई केली. ही कारवाई वास्को रेल्वे स्थानकासमोरील चिकन रस्सा, आम्लेट पाव खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच अवैध हॉटेल व्यावसायिकांवर करण्यात आली आहे.

(action taken by food and drug administration for violation of rules at vasco)

विक्रेत्यांवर वरदहस्त कोणाचा?

मिळालेल्या माहितीनुसार वास्को येथे आज अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाई केली. ही कारवाई रेल्वे स्थानकासमोरील चिकन रस्सा, आम्लेट पावसारख्या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर करण्यात आली. या विक्रेत्यांना पालिका अधिकाऱ्यांची भीती नसल्याने त्यांच्यावर वरदहस्त कोणाचा? यावरुन परिसरात चर्चा रंगल्या आहेत.

FDA Raid
Workers Strike at IFB Plant: ''ही' राज्यातील कामगारांसाठी धोक्याची घंटा'

दरम्यान लोकांच्या वाढत्या तक्रारीला अनुसरून आज अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी मुरगावचे नगराध्यक लिओ रॉड्रिग्स,नगरसेवक विनोद किनळेकर, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांच्या समवेत येथील गाड्यांना अचानक भेट दिली असता गलिच्छ वातावरणात हे गाडेधारक लोकांना अन्न पुरवत असल्याचे प्रत्यक्ष पाहीले.

FDA Raid
Marathi Science Council Goa: 19 तारखेपासून गोव्यात मराठी विज्ञान परिषदेचे 57 वे अधिवेशन

अवैध हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई

या कारवाईत साई आशीर्वाद आणि स्टार फास्टफूड नावाचे दोन स्टॉल फूटपाथवर अन्न तयार करताना आढळले असल्याने त्यांच्याकडील सर्व उपकरणे काढून घेत नोटीस बजावण्यात आली आहे.

यावेळी हॉट चिप्स आऊटलेट्स आणि मंथन काजू यांची तपासणी करण्यात आली आणि चुकीच्या ब्रँडेड वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. रतन बोराणा संचालित मंथन काजुवाला यांच्याकडून काजूचा वैधानिक नमुना यापूर्वी काढण्यात आला होता, तरीही तो दिशा आणि दिशांच्या आत समान लेबल वापरत असल्याचे आढळल्याने यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com