मडगावात रस्ता सुरक्षेबद्दल लवकरच कृतियोजना; पालिकेतील संयुक्त बैठकीत निर्णय

विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांकडून सूचना
margao
margao Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगावातील रस्ता सुरक्षेसंदर्भात लवकरच कृती योजना आखण्यात येईल, असे मडगाव पालिकेच्या सभागृहात पालिका क्षेत्रातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयीन शैक्षणिक संस्थांच्या व सामाजिक संस्था तसेच वाहतूक पोलिस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत ठरवण्यात आले.

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत जवळ जवळ २५ शैक्षिणिक संस्थांचे, बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी, पालक, पोलिस, वाहतूक व पालिकेचे अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

margao
कामाच्या ठिकाणी दिव्यांगजनांचा आत्मसन्मान जपा: गुरुप्रसाद पावसकर

या बैठकीत रस्ता सुरक्षा बद्दलचे वेगवेगळे नियम, खबरदारी घेण्याचे प्रकार, कायद्याबद्दलची माहिती देण्यात आली. शिवाय शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी या संदर्भातील आपल्या अडचणी, समस्या सांगितल्या व काही महत्वाच्या सूचना केल्या. वाहतूक वॉर्डन बनण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे,असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा जास्तीत जास्त जूनमध्ये कृति योजना तयार केली जाईल, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. शाळा परिसरात पार्किंग सोय करण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांचीही असते, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्त्यासंदर्भात ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या नगरपालिकांवर सोपवाव्यात, अशी सूचनाही रोलांड मार्टीन्स यांनी केली.

या बैठकीत शाळांमध्ये रस्ता सुरक्षा बद्दल माहिती देणारे माहिती फलक असणे, शाळांच्या परिसरात रस्त्यावर पुढे शाळा आहे म्हणून सूचना फलक लावणे, शाळा सुरु होण्यापुर्वी व सुटण्याच्यावेळी काही रस्ते नो ट्रॅफिक झोन करणे, मडगावच्या जुना बस स्टॅण्डवर सकाळी व दुपारच्या वेळेसाठी पालकांना वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करणे, सारख्या सुचना या बैठकीत मांडल्या गेल्या.

margao
Bicholim News : घरावर झाड कोसळले; सुदैवाने आईसह मुलगा बचावला

"शैक्षणिक संस्थांनी मांडलेल्या समस्यांची जाणीव आम्हाला आहे. त्यांच्या समस्यांचा जूनपर्यंत आढावा घेऊन कृति योजना तयार केली जाईल. ऑगस्ट २०२२ मध्ये शिक्षण खात्याने जारी केलेल्या सूचनेनुसार सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलांची वाहतूक समिती स्थापन करणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांबाबत मुलांना, शिक्षकांना, पालक शिक्षक संघाला प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे रुपांतर व्यावसायिक वाहन म्हणून करणे आवश्यक आहे."

गौतम साळुंके, वाहतूक पोलिस निरीक्षक

ही बैठक समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी आहे. रस्ता सुरक्षा बद्दलची जागृती नागरीकांमध्ये झाली असून प्रत्येक नगरपालिका, पंचायतीमध्ये रस्ता सुरक्षा समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये रस्ता सुरक्षा समस्या जाणून त्यांचे निवारण करण्यास विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे व वाहतूक वॉर्डन तयार करणे या दोन योजना लागू करणे गरजेचे आहे.

रोलांड मार्टीन्स, निमंत्रक ‘गोवा कॅन’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com