वास्कोत बेकायदेशीर थाटलेल्या दुकानावर कारवाई

''ज्यांनी बेकायदेशीर दूकाने थाटलीत त्यांनी स्वत:हून ती काढावीत''
vasco News
vasco News Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी रात्रीच्या वेळी बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेले दुकान पालिकेने कायदेशीर कारवाई करत जेसीबीने पाडण्यात आले. तसेच असल्या बेकायदेशीर कृत्यांना थारा देणार नसल्याचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रीगीस यांनी दुकारदारांना सांगितले. (Action against illegal shops in vasco - councilor Leo Rodrigue )

शनिवार व रविवार पालिकेला सुट्टी असून या सुट्टीचा फायदा घेऊन वास्कोत मध्यवर्ती ठीकाणी असलेल्या कर्मा पॉईंट या इमारतीच्या पायथ्याशी पायऱ्यांच्या खाली उघड्या जागेवर शनिवार रात्री शटर घालून दुकान तयार केले. काल रविवार पर्यन्त काम झाले व आज तो आपले दुकान चालू करणार होता. मात्र या बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या दुकानाविषयी नगराध्यक्ष लिओ रॉड्रीगिस यांच्याकडे तक्रार केली असता आज सकाळी ताबडतोब या बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या दुकानावर जेसीबी घालून कारवाई करण्यात आली.

vasco News
गोवा उद्योग संघटनेचा अ‍ॅप आधारित टॅक्सीला पाठींबा

ज्यांनी बेकायदेशीर दूकाने थाटलीत त्यांनी स्वत:हून ती काढावीत

दरम्यान याविषयी पालिका मंडळाच्या मार्केट संघाचे अध्यक्ष विनोद किनळेकर यांना विचारले असता मार्केटमध्ये सुट्टीचा फायदा घेऊन काही दुकानदार जास्त करून परप्रांतीय लोक बेकायदेशीररित्या दुकाने थाटतात व आपला हात धूवून घेतात. या कामी पालिकेला नजरकैदेत ठेवून बेकायदेशीर कामांना वास्कोत उत आला आहे. अशावर कायदेशीर कारवाई करण्यापलिकडे दुसरा पर्याय नाही. असे सांगून ज्यांनी बेकायदेशीर दूकाने थाटली आहेत अशांनी स्वत:हून ती काढण्याचे आवाहन विनोद किनळेकर यांनी केले आहे.

vasco News
Goa Panchayat Election; केपेतून दीपक फळदेसाई यांच्यासह दोन अर्ज दाखल

नगराध्यक्ष लिओ रॉड्रीगीस यांनी अशा बेकायदेशीर बांधकामाना थारा देणार नसल्याचे सांगून यापुढे दुकानदांराकडून होणाऱ्या असल्या बेकायदेशीर कृत्य चालणार नाही असे सांगितले. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी या विषयी बेकादेशीर कामांना थारा देऊ नका असे सांगितले आहे. असे नगराध्यक्ष लिओ रॉड्रीगिस यांनी सांगितले.

बिगर सरकारी संस्थेचे परशुराम सोनलेकर यांनी पालिकेने केलेल्या कारवाईबद्दल नगराध्यक्ष लिओ रॉड्रीग्स यांचे अभिनंदन केले. तसेच ही कारवाई अशीच चालू ठेवावी असे सुचविले. कारण वास्को शहरात अतिक्रमण तसेच बेकायदेशीर बांधकामाना ऊत आला असून यावर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com