Morjim: हुल्लडबाजी भोवली; मोरजी किनाऱ्यावर चारचाकी घातल्याने पर्यटन विभाग अॅक्शन मोडमध्ये

स्थानिकांनी पोलिसात केली तक्रार
Morjim beach
Morjim beachDainik Gomantak
Published on
Updated on

पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी गोवा प्रशासन प्रयत्नात आहे. यासाठी प्रशासनाने पर्यटन व्यायसायिक तसेच पर्यटकांना काही नियमावली तयार केलेली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करत एका पर्यटकाने आपली चारचाकी थेट मोरजी समुद्र किनाऱ्यावर बेजबाबदारपणे घातल्याचा प्रकार घडला आहे.

(The Tourism Dept has demanded action unauthorised parking of cars on Morjim beach)

Morjim beach
Goa Market: वाळपई बाजाराला स्थैर्य, पण वाढत्या व्यापाऱ्यांमुळे उद्‍भवताय अनेक अडचणी!

मिळालेल्या माहितीनुसार मोरजी किनाऱ्यावर बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे वाहन चालवल्याबद्दल इनोव्हा ( क्रमांक GA 03 Z 8474 ) कार घातल्याचा प्रकार आज सकाळी घडला आहे. याबाबत स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. तसेच पर्यटन विभागाने पोलिसांना कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. पोलिसांनी याची नोंद घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. व लवकरच कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

Morjim beach
Mopa Airport: गोवा नामकरण समितीतर्फे ढवळीकरांच्या प्रतिमेचे म्हापशात दहन

राज्यातील संगीत पार्ट्या थंडावल्या

राज्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रात्री 10 वाजल्यानंतर खुल्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे. त्‍यामुळे समुद्र किनाऱ्यावर अनेक ठिकाणी रात्री 10 नंतर शांतता दिसून येत आहे. यामुळे स्थानिकात समाधान आहे. न्‍यायालयाने बडगा दाखविल्‍यानंतर आता पोलिसही सतर्क होऊन कामाला लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com