Madgaon: उच्च शिक्षण संचालनालयकडून अभिनय कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा

संहिता लेखन मार्गदर्शन, नेपथ्य आणि प्रकाशयोजना, नाटक, सिनेमा आणि टीव्ही मालिका यांच्यातील फरक यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला.
Acting
Acting Dainik Gomantak
Published on
Updated on

Madgaon: उच्च शिक्षण संचालनालय पर्वरी आणि कोकणी विभाग, सरकारी महाविद्यालय केपे यांच्या संयुत विद्यमानाने रवींद्र भवन मडगाव येथे आयोजित केलेली दहा दिवसीय अभिनयशास्त्र प्रमाणपत्र कोर्स कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेत मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नट आणि दिग्दर्शक, झी गौरव आणि मटा सन्मान विजेते अभिनेते अभिजीत झुंजारराव यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचे उद्‌घाटन 15 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता रवींद्र भवन मडगाव येथे करण्यात आले. 24 डिसेंबर रोजी या अभिनयशास्त्र नाट्यशाळेचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन सुचिता बांदेकर यांनी केले.

‘ओली सुकी’चे सादरीकरण

राजय पवार यांच्या लघुनिबंधावर आधारित असलेल्या ‘ओली सुकी’ या लघुनाटिकेचे सादरीकरण समारोप सोहळ्यात करण्यात आले. या नाटकाचे दिग्दर्शन शेफाली नाईक, गौरव किन्नरकर, प्रसाद कळंगुटकर, शशिकांत पवार यांनी केले. तर नाटकाची संकल्पना अभिजीत झुंजारराव यांची होती.

या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. ज्ञान दिल्याने ते अधिक वाढते या गोष्टीची प्रचीती या कार्यशाळेत आली. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल कोकणी विभाग, सरकारी महाविद्यालय केपे, उच्च शिक्षण संचालनालय, पर्वरी- गोवा यांचा मी अत्यंत आभारी आहे, असे अभिनेते अभिजीत झुंजारराव म्हणाले.

Acting
Goa Crime: चंद्रशेखर लमाणीच्या पोलिस कोठडीत वाढ; इंजिनियरिंग विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरण

सकाळी 10 ते दुपारी 1.30 वा. आणि दुपारी 2 ते सायंकाळी 4 वा. अशा सत्रात चालणाऱ्या या कार्यशाळेत आवाजावर नियंत्रण कसे आणावे, वेगवेगळे आवाजाचे व्यायाम, नाटकाशी संबंधित प्रात्यक्षिके, संहिता लेखन मार्गदर्शन, नेपथ्य आणि प्रकाशयोजना, नाटक, सिनेमा आणि टीव्ही मालिका यांच्यातील फरक यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

NEP Implementation In Goa
Goa Government Cyber Security
Advocate Ankur Kumar Attack Goa
Goa School Retention Rate
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com