Goa Crime: चंद्रशेखर लमाणीच्या पोलिस कोठडीत वाढ; इंजिनियरिंग विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरण

संशयिताविरुद्ध मजबूत पुरावे पोलिसांना सापडल्याने या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे.
 Panjim Rape Case
Panjim Rape Case Dainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Rape Case: नाताळ पार्टीसाठी वास्कोहून पणजीत आलेल्या एका विद्यार्थिनीवरील बलात्कारप्रकरणातील संशयित चंद्रशेखर लमाणी याच्या पोलिस कोठडीत पणजी सत्र न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली आहे.

संशयिताने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पीडित विद्यार्थिनीचीही न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंदवण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

झुआरीनगर-वास्को येथील इंजिनियरिंग मुला-मुलींचा एक गट नाताळ सणानिमित्त पणजीत पार्टी करण्यासाठी तसेच खरेदीसाठी आला होता. या गटात मुलगे - मुलगी यांचा समावेश होता. यातील एका मुलीने अतिमद्यप्राशन केल्याने पणजी बस पोहचल्यावर ती इतरांसमवेत न जाता ती पार्किंग केलेल्या बसमध्येच मागील सीटवर झोपली.

या संधीचा फायदा घेऊन व पीडित तरुणी दारूच्या नशेत असल्याने संशयित बस चालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर बसचालक तेथून पसार झाला. तिचे इतर साथीदार बसमध्ये परतल्यावर पीडित तरुणीने झालेली घटना आपल्या मैत्रिणींना सांगितली. याप्रकरणी तिच्या मैत्रिणींनी पोलिस स्थानक गाठले व तक्रार दाखल केली.

 Panjim Rape Case
Goa Tourism: पर्यटकांचा परतीचा प्रवास सुरू; रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी

संशयित चंद्रशेखर लमाणी हा घडलेल्या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यास पोलिस अटक करतील या भीतीने पणजी परिसरात फिरत होता. त्याला पणजी पोलिसांनी त्याच्या मोबाईल ट्रॅकिंगवर शोधून काढून अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने भीतीनेच केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

याप्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीसोबत आलेल्या व घटनेची प्रथमदर्शनी माहिती सांगितलेल्या तिच्या मैत्रिणींच्याही जबान्या नोंदवल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या साहाय्याने काही ठोस पुरावे बसमधून जमा केलेले आहेत.

तसेच दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे. संशयिताविरुद्ध मजबूत पुरावे पोलिसांना सापडल्याने या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध लवकर आरोपपत्र सादर होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sanjeel Kudchadkar Abduction Margao Goa
Sanjeel Kudchadkar Kidnapping Suspect
Goa Job Scam
Goa Spa Owner Rape Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com