Online Fraud: RBL बँकेला 9.2 लाखांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या आरोपीला हरियाणातून अटक, गोवा सायबर क्राईमची कारवाई

गुप्तचर विभागाच्या सहकार्याने मुबारिक रा. दीन मोहम्मद याला अटक करण्यात आलीय.
Online Fraud
Online FraudDainik Gomantak
Published on
Updated on

Online Fraud गोव्यातील वाढत्या सायबर क्राईमच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले असून या घटनांच्या तपासासाठी सायबर क्राईम पोलीस सतर्क झाले आहेत. काही दिवसांपूर्वी RBL बँकेचे ATM नेटवर्क हॅक करून 9.2 लाख रुपये काढल्याची घटना घडली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. कित्येक दिवस सायबर क्राईम पोलीस संशयिताच्या मागावर होते. अखेर या चोरी प्रकरणी गुप्तचर विभागाच्या सहकार्याने मुबारिक रा. दीन मोहम्मद (गढी मेवात हरियाणा) याला अटक करण्यात सायबर क्राईम पोलीसांना यश आलंय.

या अटकेविषयी सविस्तर माहिती देताना पोलिसांनी सांगितलं कि, आरोपीला पकडण्याचा आमचा हा दुसरा प्रयत्न होता. आरोपीला ज्या गावातून अटक करण्यात आली तो हरियाणा मधील भाग हा अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी कोणत्याही आरोपीला पकडण्यासाठी सशस्त्र पोलिसांसह 6-8 वाहने घेऊन जावं लागतं. मात्र प्रभावी गुप्तचर यंत्रणेमुळे आरोपीला सहज आणि यशस्वीपणे पकडण्यात यश आलंय.

Online Fraud
Margao Drugs Case: नागोवा येथे 4 लाखांचे ड्रग्ज जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

एसपी शिवेंदू भूषण, पीआय देवेंद्र व्ही. पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हेड कान्स्टेबल योगेश खांडेपारकर, पीसी-संयोग सी. शेट्ये, पीसी-इब्राहिम करोल, पीसी-विनय आमोणकर आणि सायबर क्राइमचे पीसी-हेमंत गावकर यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा यशस्वीपणे तपास करण्यात आला. आरोपीला पणजी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com