सत्तरीत गढुळ पाण्याचा पुरवठा; नागरिक हैराण

नागरिकांनी दाद कुठे मागायची
Muddy water supply in Sattari Civil harassment
Muddy water supply in Sattari Civil harassment Dainik Gomantak
Published on
Updated on

सत्तरी तालुक्यातील केळावडे गावात सतत गढुळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. दरवर्षी पिण्याच्या पाण्याची हीच स्थिती असल्याच सांगत नागरिक (Citizen) नाराजी व्यक्त करत आहेत. संबंधित विभागात याची वेळोवेळी माहिती देऊन देखील पावले उचलली जात नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे दाद कुठे मागायची हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

Muddy water supply in Sattari Civil harassment
उन्हाळ्यात थंडावा; फक्त 400 रुपयात एसी

गोव्यात ठिकठिकाणी पाण्याचा (water) प्रश्न निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच संबंधित विभागाला याची माहिती देऊन योग्य त्या कारवाईची देखील मागणी करत आहेत. मात्र हा प्रश्न सुटताना दिसत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे देखील निघताना दिसत आहेत.

Muddy water supply in Sattari Civil harassment
भ्रष्ट भाजप सरकारपासून गोवेकरांचा बचाव करू; अमित पालेकरांची बोचरी टीका

दरम्यान, मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेसचे युवा उमेदवार जनार्दन भंडारी यांनी विश्रांती न घेता सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलक असल्याचे सिद्ध केले. काणकोणमधील काही भागांना पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रारी येथील रहिवाशांनी केल्या होत्या मात्र निवडणूक काळात त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.

आज गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक (Prashant Naik), जनार्दन भंडारी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसमवेत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला व पंधरा दिवसांत या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आग्रह धरला आहे. यावेळी त्याच्या सोबत सिद्धार्थ गायक, कॉंग्रेसच्या महिला गटाध्यक्ष उर्सिला डिकॉस्टा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्तगाळ, फुलामळ, पैगीण पंचायत क्षेत्रातील पोटके व अन्य भागात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नाही हा त्यांचा दावा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com