पणजी: आम आदमी पक्षाने भंडारी समाज आणि ख्रिस्ती धर्मातील नेते, कार्यकर्ते आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठीच भंडारी समाजाला मुख्यमंत्रिपदाचे आमिष दाखवले असून ख्रिस्ती धर्मातील व्यक्तीला उपमुख्यमंत्रिपद देण्याची घोषणा केली आहे.
या निर्णयामुळे राज्यात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून राजकीय पक्षांनी ‘आप’च्या या कृतीला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेसने या जातीय राजकारणावर टीका केली असून ‘आप’चा हा शेवटचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तर भाजपने वैफल्यग्रस्तेतून ‘आप’ असे करत असल्याचे म्हटले आहे. रिव्होल्युशनरी पार्टीने जातीयतेला राज्याच्या राजकारणामध्ये थारा नसल्याचे म्हटले आहे, इतर राजकीय पक्षांनी या विषयापासून स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही राजकीय नेत्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला दिला आहे. यामध्ये मगो पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्षाचा समावेश आहे.
गोव्यात ‘आप’ला यश मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन ते जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता येणार नाही. उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल, अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळेच हा पक्ष खालच्या स्तराचे राजकारण करत आहे.
- उर्फान मुल्ला, प्रवक्ते, भाजप
‘आप’ने ही घोषणा करून जात व धर्माचे राजकारण केले आहेत. मतदारांना आकर्षित करण्याचा हा त्यांचा अखेरचा प्रयत्न आहे. काँग्रेसने कधीच जात किंवा धर्माच्या नावावर राजकारण केले नाही. बहुजन समाजाला नेहमीच न्याय दिला आहे.
- गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.