Panaji News : लेखा कर्मचाऱ्यांची ‘कोंदट’तेतून मुक्ती; प्रसन्न वातावरणात करता येणार काम

उद्यापासून नव्या वास्तूत कामकाज
Panaji News :
Panaji News : Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News : पणजी, मिळेल तिथे मांडलेली टेबले, दाटीवाटीने बसलेले कर्मचारी, खेळती हवा येण्याचीही पुरेशी सोय नाही, अशा कोंदट वातावरणात ४२१ जण मान मोडून काम करतात, हे चित्र सरकारी कार्यालयात दिसणे तसे दुर्मिळ.

लेखा संचालनालय त्याला अपवाद असावे. आकडेमोड करत हे कर्मचारी त्याच कार्यालयातल्या निरस वातावरणाला सरावलेले होते. आता उद्यापासून त्यांना प्रसन्न वातावरणात काम करण्याची संधी मिळणार आहे.

पणजीतील लेखा संचालनालयाच्या इमारतीची बैठक क्षमता १२० च्या आसपास आहे. त्या जागेत ४२१ जण काम करत आहेत. ती इमारत सरकारी कार्यालयासाठी म्हणून उभारण्यात आली नव्हती. कदंब काळात शेतसारा, महसूल गोळा करणारी इमारत म्हणून ती उभारण्यात आली.

Panaji News :
E-Buses in Panaji: राजधानी पणजीत लवकरच सुरू होणार ई-बसेस; बसेसमध्ये असणार अत्याधुनिक सुविधा

गावोगावच्या गावकारी ग्रामसंस्थांकडून कराची वसुली याच इमारतीच्या कार्यालयातून होत होती. आदिलशाही काळात खजिना ठेवण्यासाठी आणि पोर्तुगीज काळात टांकसाळ चालवण्यासाठी या इमारतीचा वापर केला जायचा.

त्या गरजेनुरुप बांधलेल्या इमारतीत १९६२ मध्ये लेखा संचालनालय सुरू झाले आणि तेथेच सुरू राहिले. गरजेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेली. भविष्य निर्वाह निधी, राजपत्रित, अराजपत्रित, सेवानिवृत्तीवेतन, कोषागार असे विभाग आकाराला येत गेले.

त्याच इमारतीचा प्रत्येक चौरस इंचाचा भाग वापरात येईल, असे पाहण्यात आले.

करकर आवाज करणारे लाकडी जिने, कुरकुरणारे भले मोठे लाकडी दरवाजे, कुबट असे वातावरण, कपाटात जीर्ण होत आलेली कागदपत्रे, कधीही न उघडल्या गेलेल्या संदुका, सभागृहाची पडायला आलेली लाकडी गच्ची, अशा स्थितीत सरकारच्या पै अन् पै चा हिशेब ठेवण्याचे काम हे खाते करत आले आहे.

Panaji News :
Goa Unseasonal Rain: राज्यात अवकाळीचे 'धुमशान'; शेतकरी चिंतेत, हातातोंडाशी आलेला घास 'पाण्यात'

पर्वरी येथील नव्या तीन मजली इमारतीत प्रशस्त वातावरणात शुक्रवारपासून या कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. त्याशिवाय वाहने ठेवण्यासाठी पर्वरीत मुबलक पार्किंगच्या जागेची सोय आहे.

लेखा खात्याच्या कामाला आवश्यक अशी इमारत पर्वरीत सरकारने उपलब्ध केली आहे. तेथील वातावरणाचा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर चांगला परिणाम निश्चितपणे होईल. पणजीपासून केवळ अडीच किलोमीटर अंतरावर हे कार्यालय आहे.

- दिलीप हुम्रस्कर, लेखा संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com