Accident Death: अवघ्या दोन किमीवर होतं घर, पण वाटेतच काळाने गाठलं; फोंड्यात उड्डाण पुलावरून कार कोसळून युवक जागीच ठार, चौघे गंभीर

Ponda Flyover Accident: घरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असतानाच फोंडा कदंब बसस्थानकाजवळ क्रूर काळाने झडप घातली आणि अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.
Ponda Flyover Accident
Ponda Flyover AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : घरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असतानाच फोंडा कदंब बसस्थानकाजवळ क्रूर काळाने झडप घातली आणि अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. कार उड्डाणपुलावरून सुमारे वीस मीटर खाली कोसळल्यामुळे तिचा चक्काचूर झाला. या अपघातातील अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

सविस्तर माहिती अशी, की फोंड्यातील कदंब बसस्थानकावरील उड्डाणपुलावर हा अपघात शनिवारी रात्री एकच्या सुमारास झाला. एखाद्या चित्रपटातील दृश्‍याप्रमाणे जीए-०८-एन-०५४७ या क्रमांकाची भरधाव कार फर्मागुढी - फोंडा मार्गावरील उड्डाणपुलालगतच्या संरक्षक कठड्याला धडकून सुमारे वीस मीटर खाली कोसळली. त्यात प्रदीप राचप्पा गौडा (वय २८ वर्षे) हा हवेली - कुर्टीतील वीज खात्याच्या वसाहतीत राहणारा युवक जागीच ठार झाला. इतर चार गंभीर जखमींना गोमेकॉत दाखल केले आहे

अपघातग्रस्त कारमधील पाचही जण मित्र असून शनिवारी ते गोव्याबाहेर गेले होते. रात्री उशिरा गोव्यात परतत होते. एवढा प्रवास करून घरी परतायला दोन किलोमीटर अंतर शिल्लक असतानाच हा अपघात झाला. हे पाचहीजण कोणत्या कामासाठी गेले होते, ते स्पष्ट झालेले नाही. अपघातग्रस्तांपैकी दोघाजणांना गोमेकॉत शस्त्रक्रियेसाठी नेले असून अन्य दोघे बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात आले.

Ponda Flyover Accident
Goa Assembly Session: बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था '39-अ'चा हिशेब 3 दिवसांत; अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही कसोटी

चालकाला झोप लागल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले असावे, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. प्रदीपचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नंतर तो अंत्यविधीसाठी कर्नाटकातील मूळ गावी नेण्यात आला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

एकाच कुटुंबातील तिघे गंभीर

या अपघातात अरबाझ सनदी (वय ३० वर्षे, रा. नागझर कुर्टी), अदनान सनदी (वय २० वर्षे), इम्रान शेख (वय ४८ वर्षे), आफताब सनदी (वय २५ वर्षे, तिघेही रा. नागामशीद - कुर्टी) हे चौघेजण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त सनदी एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.

Ponda Flyover Accident
Goa Sports: 'गोव्यातून ऑलिंपियन घडवायचाय'; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोठे लक्ष्य, क्रीडा शिक्षकांना संघटनांशी समन्वय साधण्याचे आवाहन

जोरदार आवाज; जखमींचा आक्रोश

कार उड्डाणपुलावरून खाली कोसळल्यानंतर जोरदार आवाज झाला. यावेळी कारमधील जखमींनी मोठ्याने आरडाओरड केली. त्यामुळे बसस्थानकावरील लोक धावत घटनास्थळी आले. अपघातानंतर फोंडा पोलिस तसेच अग्निशामक दलाचे जवान आणि इतर लोकांनी बचावकार्य सुरू केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com