Bicholim Accident: जीपगाडीच्या धडकेत दोघेजण जखमी; व्हाळशी जंक्शनवर अपघात

Bicholim Accident: नुकतेच लोकार्पण झालेल्या डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावरील व्हाळशी जंक्शनवर अपघात घडला
Accident at Walshi Junction in Bicholim
Accident at Walshi Junction in Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Accident: अलीकडेच लोकार्पण केलेल्या डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावरील व्हाळशी येथील जंक्शनवर आज (बुधवारी) पहिला अपघात घडला. या अपघातात मोटारसायकलवरील दोघेजण जखमी झाले. पैकी एकजण गंभीर जखमी झाला. जीपगाडीने त्‍यांना ठोकरले.

आज सकाळी आठच्या सुमारास हा अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव मनोजकुमार असे असून, त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. तर, अमरनाथ हा युवक किरकोळ जखमी झाला.

जखमी दोघेही युवक मूळ बिहार येथील आहेत. ते कामानिमित्त गोव्यात वास्तव्यास आहेत. दरम्यान, बगलमार्गावरील दोन्ही बाजूची जंक्शन्‍स धोकादायक बनली असून, तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे.

Accident at Walshi Junction in Bicholim
Ponda Accident Cases : वीस दिवसांत सहाजणांचा बळी; नियम धाब्यावर

मिळालेल्‍या माहितीनुसार, अमरनाथ आणि मनोजकुमार हे दोघेही मोटारसायकलवरून (एमएच ०९ ईडी ८७३८) डिचोलीच्या दिशेने जात होते. मुख्य रस्त्याला जोडलेल्या बगलमार्गावरील जंक्शनवर पोचताच वेगाने मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जीपगाडीची (जीए ०४ सी ०८२५) मोटारसायकलला धडक बसली. त्यात दुचाकीस्‍वार अमरनाथ आणि त्याच्यामागे बसलेला मनोजकुमार हे दोघेही रस्त्यावर आदळले.

या अपघातात मनोजकुमार गंभीर जखमी झाला. लागलीच त्‍याला १०८ रुग्णवाहिकेने डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्‍यात आले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com