Goa Agriculture : काणकाेण तालुक्यातील खरीप शेतीच्या कामांना यंदा विलंब

कृषी खात्याकडून जैवखताला प्रधान्य : जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी पूर्ण होण्याची अपेक्षा
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

सुभाष महाले

काणकोणात यंदा पाऊस लांबल्याने जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरण्या पूर्ण होण्याची अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप ६० टक्के खरीप शेतीची नांगरणी पूर्ण होऊन पेरणी झाली आहे.

त्यामुळे संपूर्ण शेतजमिनीची नांगरणी होऊन पेरणी होईपर्यंत जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडणार आहे. काणकोणात सरासरी १५ जुलैपर्यंत खरीप शेतीची पेरणी पूर्ण होत होती.

मात्र, यंदा पाऊस पंधरा दिवस उशिरा सुरू झाल्याने पेरणी पंधरा ते वीस दिवस पुढे गेली आहे. काणकोणात एकूण १,८०० हेक्टर जमीन खरीप भातशेती लागवडीखाली आहे आणि सर्व जमिनीत भातशेतीची लागवड करण्यात येते, असे काणकोणच्या विभागीय कृषी कार्यालयाचे साहाय्यक विभागीय कृषी अधिकारी सर्वानंद‌ सर्वणकर यांनी सांगितले.

काणकोणमधील बहुतेक शेतकरी ज्योती, कर्जत, जया या भातबियाण्यांना पसंती देतात. त्याशिवाय गोवा धान-३, रत्नागिरी-६ या भातबियाण्यांची पेरणी शेतकऱ्यांकडून केली जाते. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतावर अनुदान दिले जाते.

मात्र, कृषी खाते सध्या जैवखताला प्रधान्य देत आहे. आजही काणकोणमधील काही शेतकरी शेतलागवडीसाठी पालापाचोळा, शेणखत यांचा वापर करून भातपीक घेत आहेत, असे गावडोंगरी येथील एक युवा शेतकरी जानू गावकर व खोतीगावातील कृष्णा गावकर यांनी सांगितले.

Goa Agriculture
Goa G20 Summit : ‘इलेक्ट्रिफाय गोवा’ ईव्ही रॅलीचे 22 रोजी आयोजन

काणकोणमधील कृषी क्षेत्रावर एक कटाक्ष...

  • तालुक्यात ४२ हेक्टर शेतजमीन वायंगण पिकाखाली आहे.

  • तालुक्यात सर्वाधिक खरीप भातशेतीची जमीन गावडोंगरी पंचायत क्षेत्रात आहे.

  • शेती-बागायती क्षेत्राखाली ९,१२० हेक्टर जमीन लागवडीखाली.

  • खरीप हंगामात २५० हेक्टर जमीन, रब्बी हंगामात ३५० हेक्टर जमीन भाजी लागवडीखाली.

  • ३,५०० हेक्टर जमिनीवर काजू लागवड केली जाते.

  • तालुक्यातील ३,९२० शेतकऱ्यांकडे कृषी कार्डे असून १,५५३ शेतकरी प्रधानमंत्री कृषी योजनेखाली आहेत.

  • अद्याप सुमारे ३,००० शेतकरी व बागायतदार वेगवेगळ्या कारणांसाठी कृषी कार्डांपासून वंचित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com