सुमारे 650 IRB जवानांचे मतदान धूळखात

उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेल्या सुमारे 600 ते 650 IRB जवानांचे पोस्टल बॅलेट मतदान एकतर त्यांच्या निवासस्थानी किंवा संबंधित पोलिस ठाण्यात पडून
Goa Election 2022
Goa Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक पार पडली असून येथे सुमारे 600 ते 650 भारतीय राखीव बटालियनचे (IRB) जवान कर्तव्यावर तैनात करण्यात आले होते. मात्र आता या जवानांनी केलेले पोस्टल बॅलेट मतदान एकतर त्यांच्या निवासस्थानी किंवा संबंधित पोलिस ठाण्यात पडून असल्याचे समोर आले आहे. तर आतापर्यंत तेथील कोणत्याही अधिकाऱ्यांनी ते मतदान वेळेवर पोहचेल अशी जबाबदारी घेतलेली नाही.

तर गोव्यातील विधानसभा निवडणुकीआधी (Goa Assembly Elections) एक आठवडा अगोदर 14 फेब्रुवारी रोजीच पोस्टल मतपत्रिका (Ballot Paper) त्यांच्या नियुक्त ठिकाणी पोहोचल्या होत्या; मात्र निवडणूक कर्तव्यामुळे काहींना मतदानापासून दूर ठेवण्यात आले होते. त्या संबंधीत कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून पोस्टल बॅलेट मतदान मतमोजणीपूर्वी पोहोचणे गरजेचे आहे.

त्यांनी “आयआरबीय प्रोटोकॉलचे पालन केले. काहींनी त्यांच्या राहत्या घराच्या पत्त्यावर पोस्टल बॅलेट मतदान पाठवले. तर उरलेल्यांनी पोलिस स्टेशनमधून मतदान करण्याचा पर्याय निवडला, जिथे ते नियमित कायदा आणि सुव्यवस्थेच्या कर्तव्यावर तैनात होते. मात्र मतदानाच्या आदल्या आठवडाभर गर्दी होती. त्यामुळे आम्ही तक्रार करत नाही कारण तो आमच्या कर्तव्याचा भाग आहे. आता आम्हाला आमची मते देण्याची संधी दिली पाहिजे, असे मत एक IRB जवानाने व्यक्त केले आहे.

Goa Election 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या गोव्यातील नागरीकांना राज्यात सुरक्षितपणे परत आणा: सावाईकर

काहींना मतदानाची संधी मिळालेली नाही, ते गोव्यासह राज्यभरात मतमोजणी सुरू होण्यापूर्वी परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेश मतदानानंतर कर्मचाऱ्यांना आराम मिळाला असून जर ते 10 मार्चपूर्वी आपल्या मूळ राज्यात परतले तरच पोस्टल बॅलेट मतदान होऊ शकते. पण 7 मार्च रोजी यूपी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कर्मचार्‍यांना आधीच ड्युटी देण्यात आली आहे. त्यांची परतीची तारीखही नाही. गोव्याला जाणार्‍या रेल्वे गाड्या सुरू आहेत किंवा नाही याची खातरजमा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केलेली नाही. तर ही बाब 600 हून अधिक मतांची आहे. नवीन मतपत्रिकाही जारी केल्या जाऊ शकत नाहीत, हे ही पहावे लागेल असे दुसऱ्या जवानाने सांगितले.

तसेच भारतीय राखीव बटालियन कर्मचारी (गोवा पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासह) हे 13 फेब्रुवारीपासून आपल्या कर्तव्यावर होते. मात्र त्यानंतर त्यांना यूपीसाठी विशेष ट्रेनमध्ये चढावे लागले होते. गोवा पोलीस, आयआरबी आणि सीएपीएफचे सुमारे 950 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या दहा कंपन्या दोन दिवसांच्या प्रवासानंतर गेल्या गुरुवारी 17 फेब्रुवारीला त्यांच्या निवडणूक ड्युटीच्या ठिकाणी पोहचल्या. त्यानंतर त्यांच्या कामाला सुरूवात झाली. दरम्यान, 14 फेब्रुवारीला मतदान न करणाऱ्या सर्वांची माहिती गोवा पोलिसांना आधीच मिळवल्याचे सुत्रांकडून कळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com