Goa Assembly: पोलिस कुरकुरीत असतात की काय? विधानसभेत 'गोमन्तक' झळकावत व्हेन्झींची विचारणा
MLA Venzy VeigasDainik Gomantak

Goa Assembly: पोलिस कुरकुरीत असतात की काय? विधानसभेत 'गोमन्तक' झळकावत व्हेन्झींची विचारणा

Goa Assembly Monsoon Session 2024: चोरांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याचे 'गोमन्तक'च्या बातमीत म्हटले आहे, याची सरकारने दखल घेतली पाहिजे.
Published on

पोलिस कोठडीतून चोरटे पळतात. पोलिस कुरकुरीत असतात की काय, अशी जोरदार विचारणा करत बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी विधानसभेत आज 'गोमन्तक' वृत्तपत्र फडकावले.

मायणा-कुडतरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोघे पळाल्याचे वृत्त आज 'गोमन्तक'ने पहिल्या पानावर प्रसिद्ध केल्याकडे त्यांनी विधानसभेचे लक्ष वेधले. दक्षिण गोव्यातील पोलिस अधिकारी जनतेचे सोडाच पत्रकारांचेही फोन घेत नसल्याची 'गोमन्तक'मधील बातमी त्यांनी विधानसभेत दाखवली. 'गोमन्तक'चा आजचा अंक त्यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला.

विधानसभेचे कामकाज आज सकाळी ११.३० वाजता सुरू झाले तेव्हा आपल्याला हरकतीचा मुद्दा मांडायचा आहे, असे सांगत व्हिएगस उठले. ते 'गोमन्तक'चा आजचा अंक सभापती रमेश तवडकर यांना दाखवू लागले.

ते म्हणाले, पोलिसांच्या ताब्यातून चोर पळून जातात, हे काय चालले आहे. अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. पोलिस कुरकुरीत होते की काय म्हणून चोरांना पळता आले.

चोरांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याचे 'गोमन्तक'च्या बातमीत म्हटले आहे, याची सरकारने दखल घेतली पाहिजे. पोलिस फोन घेत नाहीत, ही बाबही साधी नाही.

Goa Assembly: पोलिस कुरकुरीत असतात की काय? विधानसभेत 'गोमन्तक' झळकावत व्हेन्झींची विचारणा
'गोवा माईल्स'ला विरोध कायम, मोपा लिंक रोडवरील टोल हटवण्याची मागणी; स्थानिक टॅक्सीचालकांनी पुकारले बंड

मुख्यमंत्री गप्पच!

एरव्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बातमीची खात्री केल्याशिवाय वर्तमापत्र फडकवू नका. वर्तमानपत्रात येणाऱ्या साऱ्याच बातम्या खऱ्या असतात असे नाही, असे आमदारांनी वर्तमानपत्र फडकावल्यानंतर सांगतात. आज मात्र व्हिएगस यांनी 'गोमन्तक' फडकावल्यानंतर त्यांनी अशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com