रोजगार हमी माहितीसाठी ‘आप’ गोमंतकीयांच्या भेटीला

आपने नावेली, केपे, पेडणेत राबवली मोहीम, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत
AAP Goa
AAP GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या रोजगार हमीची माहिती आम आदमी पक्ष (AAP) गोव्यातील (Goa) तळागाळात पोहोचवत आहे. इतर पक्षाचे नेते पक्षांतर करण्यात तर काहीजण केडरच्या व्यवस्थापनात व्यस्त आहेत. आप याला अपवाद ठरला असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करत आहेत. नावेली, केपे आणि पेडणेमधील पक्षाचे नेते स्थानिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि आपचा संदेश तळागाळापर्यंत नेण्यासाठी लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

पेडणेच्या आप कार्यकर्त्यांनी धारगळमधील स्थानिकाची भेट घेतली. घरोघरी जाऊन गोवा रोजगाराच्या क्षेत्रात मागे का आहे आणि गोव्यातील तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत, याची माहिती त्यांनी स्थानिकांना दिली. खाण आणि पर्यटन व्यवसाय कोलमडल्याने अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंबाला नोकरी मिळेपर्यंत दरमहा ५००० रुपये भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

AAP Goa
Goa: मये पंचायत क्षेत्रातील हातुर्ली-तिखाजन रस्ता बनला खड्डेमय

केपेमधील रहिवाशांची आपचे सहसचिव राऊल परेरा यांनी भेट घेतली. महामारी काळात सरकार जनतेसोबत राहण्यास अपयशी ठरल्याबद्दल यावेळी महिलांनी संताप व्यक्त केला. आप गोवा उपाध्यक्ष ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनीदेखील घरोघरी जाऊन नावेलीच्या रहिवाशांना भेटत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार लुईझिन फालेरो यांनी या मतदारसंघाला पोरके केले आहे. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमदारकी सोडल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. गेल्या आठवड्यात मी दुकानदार, गाडेमालक, महिला बचत गट, टॅक्सीचालक आणि मोटारसायकल पायलटना भेटले आहे.

AAP Goa
Goa Politics: तरुणांच्या रोजगारावरून भाजप-आप आमनेसामने !

‘आप’ गोवेकरांसोबत

लॉकडाऊन दरम्यान लोकांना मदत मिळाली नसल्याने ते सरकारवर नाराज आहेत. आमदाराशिवाय आम आदमी पक्ष त्यांच्या पाठीशी कसा उभा राहिला याबद्दल सर्वजण आभार मानत असल्याचे ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले. गोवेकरांनी खुल्या मनाने आमचे स्वागत केले आहे. गोवेकरांना माहीत आहे की त्यांच्यासोबत आप हा एकमेव पक्ष खंबीरपणे राहणार आहे" असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com