...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

AAP Goa health insurance promise: गोव्यातील जनतेला १० लाख रुपयांचे सर्वसमावेशक आरोग्य विमा कवच आम आदमी पक्षाचे सरकार २०२७मध्ये सत्तारूढ झाल्यावर देण्यात येईल, अशी घोषणा आतिषी यांनी आज केली.
AAP Goa health insurance promise
AAP Goa health insurance promiseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील जनतेला १० लाख रुपयांचे सर्वसमावेशक आरोग्य विमा कवच आम आदमी पक्षाचे सरकार २०२७मध्ये सत्तारूढ झाल्यावर देण्यात येईल, अशी घोषणा पक्षाच्या राज्य प्रभारी आतिषी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पक्षाचे राज्य संयोजक वाल्मिकी नाईक उपस्थित होते मान यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री सेहत योजना' अंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांपर्यंत मोफत व कैशलेस वैद्यकीय उपचारांची सुविधा 'आरोग्य कार्ड'द्वारे देण्यात येणार आहे.

पंजाबमध्ये सध्या या योजनेसाठी नोंदणी सुरू करण्यात ब्यली आहे. या योजनेला कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही आणि सर्व रहिवासी या योजनेचे लाभार्थी असतील. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य कार्डच्या आधारे सरकारी तसेव सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार पूर्णपणे मोफत व कैशलेस पद्धतीने घेता येणार आहेत.

या योजनेत हृदयविकार, कॅन्सर, किडनी विकारांसह इतर गंभीर व खर्चिक आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया, तपासण्या व औषधांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य खर्चामुळे कोणालाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्पष्ट केले.

'मुख्यमंत्री सेहत योजना' आणि आरोग्य कार्ड प्रणालीमुळे पंजाबमधील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहब उपलब्ध होईल आणि राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

केवळ पाट्या बदलल्या: वाल्मिकी

वाल्मीकी नाईक यांनी नमूद केले की, भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दर्जा सरकारने वाढवलेला नाही. केवळ दर्जा वाढवल्याची घोषणा करत पाट्या बदलल्या आहेत. आजही बांबोळी येथील गोमेकॉवर राज्यभरातील जनता आरोग्य सेवेसाठी अवलंबून आहे ही वस्तुस्थिती कोणीही नाकारणार नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com