AAP Candidate : येत्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. प्रत्येक पक्षातर्फे हळूहळू उमेदवारांची नावे गुलदस्त्यातून समोर येत आहेत. याआधी आप (AAP) पक्षाने उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या होत्या. आज आप पक्षातर्फे उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 3 उमेदवारांचा समावेश आहे. कुंभारजुवा मतदारसंघातून गोरखनाथ केरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. थिवी मतदारसंघातून उदय साळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुवे मतदार संघातून डॉ. मरियानो गुदीन्हो यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (AAP announces list of candidates)
दरम्यान, 7 जानेवारी रोजी, AAP ने गोवा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात भाजपचे माजी मंत्री महादेव नाईक, अलिना सलदान्हा आणि अमित पालेकर यांच्या नावांचा समावेश होता. त्याच वेळी, 9 जानेवारी रोजी 'आप'ने गोवा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये 10 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. यानंतर 'आप'ने 12 जानेवारीला पाच उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यानंतर 18 जानेवारीला आम आदमी पक्षाने पाच उमेदवारांसह चौथी यादी जाहीर केली. गोव्यात एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत.
'आप'ने अमित पालेकर यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे
त्याच वेळी, AAP ने पुढील महिन्यात गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अमित पालेकर यांची घोषणा केली आहे. पालेकर (46) यांनी नुकतेच 'आप'मध्ये प्रवेश केला होता आणि ते सेंट क्रूझ विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार आहेत. सध्या ही जागा भारतीय जनता पक्षाकडे आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पणजीत त्यांच्या नावाची घोषणा केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.