Verna Crime
Verna CrimeDainik Gomantak

Verna Crime: वेर्णा येथे परप्रांतीयाकडून एकावर चाकू हल्ला; पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वेस्थानकावर अटक

पीडीत तरूण गंभीर जखमी
Published on

Verna Crime: गोव्यातील वेर्णा येथे परप्रांतीयांमध्ये भांडणाचा प्रकार समोर आला आहे. त्यातून एकाने दुसऱ्याला चाकुने भोसकले असून राज्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी शिताफीने तपासाची चक्रे हलवत संशयिताला रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे.

Verna Crime
Goa Land Grab Issue: गोव्यातील जमिन हडप अपहाराची पाळेमुळे सिंधुदुर्गात?

पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्याचे नाव पंकज शारदा असे आहे. तो 21वर्षांचा असून मूळचा बिचपाल, सहिजन काला, सोनभद्र उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने तो गोव्यात आला होता. गेल्या काही काळापासून तो वेर्णा परिसरात वास्तव्यास आहे.

त्याने लवकुश (वय 26) नावाच्या दुसऱ्या एका तरूणाला चाकुने भोकसले. यात लवकुश गंभीर जखमी झाला आहे. लवकुश हा देखील मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. लवकुशवर चाकू हल्ला केल्यानंतर पंकज शारदा हा रेल्वेने राज्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.

पण रेल्वे पोलिसांनी त्याला स्थानकावरून ताब्यात घेतले. दोघांमधील भांडणाचे कारण कळू शकलेले नाही. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com