शिवसेना भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणार: आदित्य ठाकरे

गोव्यातुन शिवसेना सर्व स्थरांवरुन निवडणुका लढवणार, आणि गोव्याच्या घराघरात शिवसैनिक पोहोचला आहे.
Aaditya Thackeray
Aaditya ThackerayDainik Gomantak

आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका 2022 होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश आहे. याच पाश्वभूमीवर शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज गोवा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे (Shivsena) खाजदार संजय राऊत (Sanjay Raut) देखील गोव्यात उपस्थित आहेत.

Aaditya Thackeray
मोदींचे अच्छे दिन कुठे आहेत म्हणून दिगंम्बर कामत यांनी उपस्थित केला प्रश्न

गोव्यातुन शिवसेना सर्व स्थरांवरुन निवडणुका लढवणार आहे, तसेच गोव्याच्या प्रत्येक घराघरात शिवसैनिक पोहोचला आहे, आणि आम्हांला जनतेचा चांगलाच प्रतिसाद दिसून आला आहे. गेल्या पाच वर्षात एनडीएच्या प्रत्येक मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला आहे. आजपर्यंत गोव्यात विज आणि पाण्याचे प्रश्न तसेच टांगणीवरती राहिले आहेत. प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की कामाचे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांचे राजकारण सुरु होते, असा टोला ही यावेळी ठाकरेंनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचा देखील समावेश आहे. राजकीय नेते निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर शिवसेना युवा नेते आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील प्रमोद सावंत सरकारवर साखळी मतदार संघातून प्रचारसभा घेत हल्लाबोल केला. त्यातच आज आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सामान्य गोवेकरांशी संवाद साधला आहे.

Aaditya Thackeray
Goa Election: सावर्डेत गावकर यांना टक्कर देण्यास पाऊसकर सज्ज

दरम्यान ठाकरे म्हणाले, गोव्यात शिवसेना गोवेकरांचा विकास करण्यासाठी आली आहे. गोव्यातील प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत शिवसेना पोहोचली आहे. शिवसेना गोव्यातील आगामी निवडणुकीसह प्रत्येक निवडणुक लढवणार आहे. शिवसेना ही गोव्याला नवी नाही. भाजपने आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. गोव्यात आम्हाला गोवेकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांना आम्ही न्याय देणार आहोत. त्यामुळे स्थानिकांना नोकऱ्या देणे, शाश्वत विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.

ते पुढे म्हणाले, गोव्यात जनतेचा विकास झाला नाहीतर पक्षांचा विकास झाला आहे. राज्यतील प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारने गोवेकरांचा विश्वासघात केला आहे. उत्पल उत्पल पर्रिकरांना (Utpal Parrikar) आम्ही कोणत्याही प्रकारचा किंतु न बाळगता पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचा वाघ असतो, त्यामुळे वाघांचा कधीच बाजार होत नाही. गोव्यात अजूनही शिक्षण, आरोग्यासह पाण्याचा मोठा प्रश्न आहे. आम्ही निवडणुकीमध्ये 11 उमेदवार उभे केले आहेत. आणि मला विश्वास आहे की, ते प्रचंड बहुमताने विजयी होतील. आम्ही गोव्यातील प्रत्येक गावामध्ये जात आहोत. शिवसेनेने कधीही लपवाछपवी केली नाही. जे काही गोव्याच्या हितासाठी योग्य असेल ते आम्ही करण्यासाठी कटीबध्द आहोत. आम्ही जे वचन गोव्याला देऊ ते पूर्ण करु. तसेच इतर पक्षांना आमची भिती वाटत असल्याने ते आमच्यावर सतत टीक करत आहेत.

आम्हाला लोकांमध्ये राहून लोकांचं काम करायचं आहे. पक्ष वाढविण्याचा प्रत्येक पक्षांना अधिकार आहे, त्यामुळे आम्हाला कोणत्याही ब्लेम गेममध्ये पडायचं नाही. गोव्यात मागील दहा वर्षात कायदा सुव्यवस्थेची चिरफाड झाली आहे. सध्या राज्यात दडपशाहीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गोव्यात पर्यावरणाचा मुद्दा हा कळीचा बनला आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शाश्वत विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com