Aadar Jain Wedding: करीना, करिश्मा आणि रणबीरच्या भावाने गोव्यात उरकलं लग्न; सर्वांसमोर केला बायकोला किस

Aadar Jain and Alekha Advani marriage: करिश्मा आणि करीना कपूरचा चुलत भाऊ आधार जैनने अखेर त्याची मैत्रिण आलेखा अडवाणीशी लग्न केले आहे. गोव्यातील समुद्रकिनारी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचे लग्न झाले.
Aadar Jain and Alekha Advani marriage
Aadar Jain and Alekha Advani marriageDainik Gomantak
Published on
Updated on

करिश्मा आणि करीना कपूरचा चुलत भाऊ आधार जैनने अखेर त्याची मैत्रिण आलेखा अडवाणीशी लग्न केले आहे. गोव्यातील समुद्रकिनारी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

करीना, करिश्मा आणि रणबीरचा चुलत भाऊ आदर जैन याने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आलेखाशी लग्न केले आहे. या जोडप्याचे लग्न गोव्याच्या एका समुद्रकिनाऱ्यावर पार पडलं.

ज्यात त्यांचे काही मित्र आणि जवळचे नातेवाईक उपस्थित असल्याचं फोटोंमधून पाहायला मिळत आहे. ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पार पडलेल्या या लग्नाची झलक आता समोर आली आहे. करिश्मा कपूर, नीतू कपूर या लग्नात सहभागी झाले होते.

अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर आदर जैन आणि आलेखा यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसंच नीतू सिंहने आदर जैनच्या लग्नातील एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. ज्यात कपूर कुटुंबातील करिश्मा कपूर, रीमा जैन, रितू नंदा, अरमान जैन, त्यांची पत्नी अनिसा जैन, नीतू कपूर दिसत आहेत.

आदर जैनने गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी त्याची मैत्रीण आलेखा अडवाणीसोबत रोका केला होता. या जोडप्याच्या रोका सोहळ्याचे फोटो व्हायलर झाले होते. या सोहळ्याला करीना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.

Aadar Jain and Alekha Advani marriage
Goa Mining: बेकायदेशीर खनिज वाहतुकीस 'सरकार'चे संरक्षण? याचिकादारांकडून छायाचित्रांसह पुरावे सादर

आलेखा अडवाणी नेमकी कोण आहे?

आदर जैन यापूर्वी अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. 2020 पासून ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, 2023 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. ताराने 'स्टुडंट ऑफ द इअर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

आलेखा अडवाणी ही मुंबईतील उद्योजिका आहे. ती 'वे वेल' (Way Well) या वेलनेस कम्युनिटीची संस्थापिका आहे. या कम्युनिटीअंतर्गत वेलनेस इव्हेंट्स, वर्कशॉप्स, सेशन्स आणि रिट्रीट्स आयोजित केले जातात. आलेखाने न्यूयॉर्कमधील कॉर्नेल हॉटेल स्कूलमधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे.

आदर जैन हा हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर कुटुंबाचा सदस्य आहे. तो दिवंगत अभिनेता राज कपूर यांचा नातू आहे. आदरचे वडील मनोज जैन हे राज कपूर यांचे धाकटे बंधू रितू नंदा यांचा पुत्र आहे.

आदर जैनने २०१७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपट "Qaidi Band" मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट यशस्वी ठरला नाही, परंतु आदर जैनच्या अभिनयाचे कौतुक झाले. सध्या तो चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.

Aadar Jain and Alekha Advani marriage
Goa Politics: जनतेने मंत्र्यांना भेटावे कुठे? तानावडेंनी करून दिली मुख्यमंत्र्याच्या सूचनेची आठवण

आदर जैनचे नाव अभिनेत्री तारा सुतारिया सोबत जोडले गेले होते. मात्र, २०२२ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. नंतर आदर जैन आणि आलेखा अडवाणी यांचे नाते चर्चेत आले. अखेर आदर जैन आणि आलेखा अडवाणी यांनी १२ जानेवारी २०२५ रोजी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com