Goa Fisherman Death: अखेर शोध संपला; मोबोर येथील मच्छिमार मासेमारीसाठी गेला अन्...

...अखेर बेपत्ता तरुणाचा शोध संपला
Fishing Boat
Fishing BoatDainik Gomantak

फातोर्डा: मोबोर या ठिकाणी मच्छिमारी ट्रॅालरवर काम करणारा मच्छिमार काल दिनांक 2 नोव्हेंबर रोजी समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. या युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

(A worker working on a fishing trawler drowned in the sea at Mobor)

Fishing Boat
Morjim समुद्रात हॉटेल कर्मचारी बुडाला; पोलीस म्हणाले तो पार्टीत गेला अन्...

मिळालेल्या माहितीनुसार मोबोर या ठिकाणी मच्छिमारी ट्रॅालरवर काम करणारा मच्छिमार निरोज सामंत (26 ) हा 2 नोव्हेंबर रोजी समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. मात्र तो ज्या ट्रॅालरवर काम करत होता, तेथून तो बेपत्ता झाला होता. यानंतर बोटीवरील कामगारांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो सापडला नव्हता.

Fishing Boat
Goa Bus Stand: मडगावात नवे बसस्थानक उभारणार; प्रकल्पावर मंत्र्यांची दिल्लीत बैठक

आज दिनांक 3 डिसेंबर रोजी एका ठिकाणी सामंत याचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यामुळे युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समोर आलेले नाही. या मृत्यूमागे काही घातपात आहे का? याचा शोध घेतला जाणार असल्याचे ही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com