Goa Excise Revenue: गोव्यात अबकारी महसुलात तब्बल 33 टक्के वाढ; महसूल पोहचला 'इतक्या' कोटींवर

सन 2022-23 या वर्षातील आकडेवारी
Goa Excise Revenue
Goa Excise RevenueDainik Gomantak

Goa Excise Revenue: गोव्यात एकीकडे गेल्या काही दिवसांमध्ये कळंगुटमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे 3.5 लाख रूपये किंमतीची दारू जप्त केली असताना गोव्याला उत्पादन शुल्कातून गतवर्षात किती महसूल मिळाला आहे, याची माहिती समोर आली आहे.

गोव्याचा अबकारी महसूल 2022-23 मध्ये 33 टक्के वाढून 865 कोटींवर पोहोचला आहे. उत्पादन शुल्क आयुक्त नारायण गड यांच्या हवाल्याने इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

Goa Excise Revenue
Anjuna Police Drugs Raid: ड्रग्स तस्करी प्रकरणी शापोरा रेस्टॉरंट नंतर 'शिवा व्हॅली'वर पोलिसांचा छापा

ते म्हणाले की, उत्पादन शुल्क विभागाने 2021-22 मध्ये `650 कोटी' एवढा महसूल मिळवला होता. त्यानंतर विभागाने राबविलेल्या अनेक उपाययोजनांमुळे मागील वर्षी एकूण महसूल 865 कोटींपर्यंत वाढला आहे.

नियमांची कठोर अंमलबजावणी, महसूल गळती रोखणे, सतत देखरेख आणि सीमा चेकपोस्टवर कडक तपासणी यासारख्या उपाययोजनांमुळे महसूल वाढला आहे," असेही गड यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील उत्पादन शुल्क महसूल हा प्रामुख्याने पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून आहे. कोरोना महारोगराई काळात दारूची दुकाने व्यवसायासाठी बंद असल्याने आणि पर्यटकांची कमी संख्या यामुळे अबकारी कर संकलनाला मोठा फटका बसला होता.

तथापि, आता पुन्हा पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. मद्यविक्री वाढल्याने अबकारी महसुलात वाढ झाली आहे.

गेल्या दोन वर्षांत मद्यविक्रेत्यांसाठी व्यवसाय सुलभ करण्याच्या दिशेने केलेल्या सुधारणांमुळेही सरकारला उत्पादन शुल्कातून उच्च महसूल मिळाला आहे. यामध्ये दीर्घकालीन परवाने जारी करणे आणि मद्यविक्री परमिटची वैधता एक वर्षावरून पाच वर्षांपर्यंत वाढवणे या उपायांचा समावेश आहे.

Goa Excise Revenue
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर उद्या आंदोलन; कामाच्या संथ गतीचा 'असा' नोंदवणार निषेध

आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजे ऑक्टोबर ते मार्च या काळात परंपरेने राज्यातील अबकारी महसूल नेहमीच मजबूत राहिला आहे. दरम्यान, आयुक्तांनी राज्यातील दारू व्यवसायांना सर्व नियमांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आणि विभागाची कारवाई टाळण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, गोव्याच्या अर्थसंकल्प 2023-24 मध्ये, उच्च दर्जाच्या मद्यावरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आले आणि महसूल वाढवण्यासाठी भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (IMFL) च्या इतर श्रेणींवरील शुल्क किरकोळ वाढविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com