Minister Vishwajeet Rane: पर्वरीतही सुसज्ज आरोग्य केंद्र

Minister Vishwajeet Rane: डायलिसिस केंद्राचे उद्‍घाटन
 Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Minister Vishwajeet Rane: पर्वरी येथे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारले जाईल. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या वाढदिवसाच्या आधी त्याची पायाभरणी केली जाईल आणि त्यानंतरच्या चौदा महिन्यात ते आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू केले जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज पर्वरी येथे केली.

 Vishwajeet Rane
Minister Vishwajeet Rane: सावधान...हृदयविकाराचा तरुणाईला धोका

पर्वरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डायलिसिस केंद्राचे उद्‍घाटन आज राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खवटे यांच्यासह आरोग्य सेवा संचालक डॉ. गीता काकोडकर, केंद्राच्या उभारणीसाठी सामाजिक जबाबदारी योजनेतून आर्थिक मदत करणारे कायनेको कमान अध्यक्ष शेखर सरदेसाई आदी उपस्थित होते. फीत कापून या केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले.

प्राणी म्हणाले, आपल्याला आरोग्य विषयक प्रश्न न सामोरे जावे लागल्यानंतर त्याची तीव्रता कळते मी तो अनुभव घेतला आहे तो अनुभव सर्वसामान्यांना घ्यावा लागू नये म्हणून सरकार मोफत औषधोपचारापासून मोफत उपचारापर्यंत सर्व काही मोफत करत आहे.

 Vishwajeet Rane
Goa Fraud Case: स्वस्त-मस्त फ्‍लॅटच्‍या प्रस्तावाला अनेकजण बळी

वार्षिक तीनशे कोटी रुपयांची औषधे मोफत देणारे देशातील हे एकमेव सरकार आहे. पर्वरीचा परिसर आता पूर्वीसारखा राहिलेला नाही तो बदललेला आहे. त्याच्या गरजा वाढलेल्या आहेत ते पाहून किमान 50 खाटांचे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उभारणे गरजेचे आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपीची व्यवस्था येथे आवश्यक आहे. यामुळे पर्वरीचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे सुसज्ज आरोग्य केंद्र असेल, याची काळजी सरकार घेणार आहे. पर्वरीतही काही सुपर स्पेशालिटी सेवा देण्यात येणार आहे. गृह निर्माण मंडळाच्या जागेच्या शेजारी असलेली 2000चौरस मीटर जागा आरोग्य खात्याला दिली आहे, तेथे आरोग्य केंद्र उभारण्याची आरोग्यमंत्र्यांना विनंती आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ सिकंदर तलवार यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. काकोडकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. मंचावर अपेक्स किडनी केअरचे डॉ. शीतल लंगडे, पेन्ह द फ्रांसचे सरपंच स्वप्निल चोडणकर, सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणेकर जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक आदी होत्या.

उपयोगी सुविधा

खंवटे म्हणाले, कायनेकोचे शेखर सरदेसाई यांनी आर्थिक मदत केल्यामुळे लवकरात लवकर हे केंद्र सुरू करता आले आहे. सगळ्यांना आरोग्य विषयक गरजांसाठी यापूर्वी हळदोणे येथे जावे लागत असे त्यानंतर म्हणूनच पर्वरी येथे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. आता त्याचा विस्तार होत आहे, तरीही डायलिसिससाठी गोमेकॉत जावे लागत होते, पर्वरी परिसरात मूत्रपिंडविकाराचे ऐंशी तरी रुग्ण असतील त्यांच्यासाठी ही सुविधा उपयोगी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com