जी-20 सदस्य राष्ट्रांत 2020 पर्यंत केवळ स्टार्टअप्ससाठी एक ट्रिलियन डॉलर गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती स्टार्टअप-२०चे अध्यक्ष डॉ. चिंतन वैष्णव यांनी दिली. जी-२०च्या स्टार्टअप-२०ची आज, रविवारी सांगता झाली. त्यानंतर डॉ. चिंतन वैष्णव माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळे आणि स्टार्टअप-२०चे अध्यक्ष डॉ. वैष्णव यांच्यात प्रमुख जाहीरनामे आणि धोरणात्मक भागीदाऱ्यांवर भर देणाऱ्या क्लोज डोअर बैठका झाल्या.
जागतिक स्तरावर स्टार्टअप्सच्या वाढीसाठी आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी सहकार्य बळकट करण्याच्या आणि प्रयत्नांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने गोव्यातील स्टार्टअप-२० प्रतिबद्धता गटाच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी महत्त्वपूर्ण चर्चा आणि बैठका झाल्या. हा करार म्हणजे जी-२० देशांचा जागतिक पातळीवर स्टार्टअप परिसंस्थांना चालना देणारा एक महत्त्वाचा क्षण ठरला.
डॉ. वैष्णव यांनी हा महत्त्वाचा टप्पा साध्य करण्यात जी-२० देशांदरम्यान झालेल्या प्रदीर्घ चर्चा आणि एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले. स्टार्टअप परिसंस्थेसाठी एक ट्रिलियन डॉलर्सच्या भरीव रकमेच्या तरतुदीचा प्रस्ताव मांडला. याला प्रतिनिधींनी उत्साहाने वचनबद्धता व्यक्त केली. या दिवसाचा शेवट सकारात्मकतेने झाला.
एक खिडकी योजना आवश्यक
डॉ. वैष्णव म्हणाले की, स्टार्टअप्ससाठी एक खिडकीची निर्मिती आणि स्वीकृती, स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी संस्थांच्या आणि परिसंस्थांच्या जाळ्याची निर्मिती, भांडवलाच्या उपलब्धतेत वाढ, स्टार्टअप्ससाठी बाजार नियमनात शिथिलता आणि स्टार्टअप परिसंस्थेमध्ये अतिशय कमी प्रतिनिधित्व मिळालेल्या समुदायांच्या समावेशाला प्राधान्य, त्याचबरोबर जागतिक महत्त्वाच्या स्टार्टअप्समध्ये वृद्धी या मुद्यांचा यामध्ये समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.