वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे पर्यटक गोव्यात सर्रास पाहायला मिळतात. त्यात भाडेतत्त्वावर रेन्ट बाईक अथवा कार घेऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांच्या विविध घटना वारंवार समोर येत असतात. अशी एक घटना मांडवीवरील अटल सेतू वरून समोर आली आहे.
रेन्ट बाईकवरून एक पर्यटक अटल सेतूवर रॉंग साईडने सुसाट जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
समोर आलेल्या व्हिडिओनुसार, रेन्ट बाईकवरून एक पर्यटक अटल सेतूवरून सुसाट वेगात जाताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बाईक चालक विरूद्ध दिशेने (रॉंग साईड) दुचाकी चालवत आहे. त्याच्यासोबत दुचाकीवर एक व्यक्ती देखील बसल्याचे दिसून येते. दुसऱ्या दिशेने वेगाने वाहने येत आहेत तरी दुचाकी चालक सुसाट जाताना दिसत आहे.
दरम्यान, पुलाच्या अखेरीस दुचाकी चालकाला गोवा वाहतूक पोलिस थांबवतात. आणि विरूद्ध दिशेने येत नियम का मोडला याचा जाब विचारतात. पुढे त्याच्यावर कोणती कारवाई झाली याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.
गोव्यात येणार काही पर्यटक नियमांना धाब्यावर ठेवत वाहतूक संबधित नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. अर्थात त्यांना कारवाईला देखील समोरे जावे लागते. यात देशी आणि विदेशी पर्यटकांचा देखील समावेश आहे.
पर्यटन खाते, वाहतूक विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने राज्यात येणाऱ्या पर्यटकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन वारंवार केले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.