Samudra Pratap Ship Launch: भारतीय तटरक्षक दलाची ताकद वाढणार, ‘समुद्र प्रताप’चे जलावतरण; संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

Goa Shipyard Ltd Coast Guard project: अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज हे जहाज सागरी जीवसृष्टीचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले.
Samudra Pratap Ship Launch: भारतीय तटरक्षक दलाची ताकद वाढणार, ‘समुद्र प्रताप’चे जलावतरण; संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ
Inauguration of Samudra Pratap Ship to Protect Marine Life Built by Goa Shipyard for Indian Coast Guard Minister of State for Defense Sanjay SethDainik Gomantak
Published on
Updated on

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज हे जहाज सागरी जीवसृष्टीचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले. दोन प्रकल्पांच्या पहिल्या जहाजाचा शुभारंभ नीता सेठ यांच्या हस्ते संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत अथर्ववेदाच्या मंत्रोच्चारात करण्यात आला. यावेळी या जहाजाला ‘समुद्र प्रताप’ असे नाव देण्यात आले.

लोकार्पण सोहळ्याला लोकसभा खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, गोवा शिपयार्ड लिमिटेडचे सीएमडी बी.के. उपाध्याय, भारतीय तटरक्षक दलाचे आयजी भीष्म शर्मा (पश्चिम) आणि आयजी एच.के. शर्मा, गोवा नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी आरएडीएम अजय थिओफिलस तसेच गोवा शिपयार्ड लिमिटेडचे संचालक कॅप्टन जगमोहन, सुनील बागी आणि दीपक पटवर्धन, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

गोवा शिपयार्ड लिमिटेड हे भारतीय तटरक्षक दलासाठी दोन प्रदूषण नियंत्रण जहाजे बांधत आहे. प्रथमच या जहाजांचे डिझाईन आणि बांधकाम स्वदेशी पद्धतीने केले जात आहे. भारतीय तटरक्षक दल व जीएसएल यांनी दीर्घकालीन भागीदारी करत आत्मनिर्भर भारताला वास्तविकतेत रूपांतरित करून स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.

Samudra Pratap Ship Launch: भारतीय तटरक्षक दलाची ताकद वाढणार, ‘समुद्र प्रताप’चे जलावतरण; संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ
CM Pramod Sawant: 'सरकारी शाळा बंद पडू देणार नाही', मुख्यमंत्र्यांची ग्वाही; खासगी संस्थांवर फोडले खापर!

तेलगळती रोखण्याची क्षमता

भारतीय तटरक्षक दलाच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने या जहाजाची रचना आणि निर्मिती केली आहे. या जहाजाची लांबी ११४.५ मीटर आहे, रुंदी १६.५ मीटर आहे आणि ४१७० टी विस्थापित होईल. जहाज १४ अधिकारी आणि ११५ खलाशी चालवतील. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी जहाजासाठी कील लेपन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या जहाजामध्ये तेलगळती रोखण्यासाठी दोन बाजूंनी स्वीपिंग आर्म बसवलेले आहे.

तेलगळती शोधण्याची क्षमता असलेली प्रगत रडार यंत्रणा यात आहे. जहाज सर्वात हलके असून चिकट तेल पुनर्प्राप्त करण्यासाठी, दूषित पाण्यात पंप करण्यासाठी, दूषित घटकांचे विश्लेषण करण्यासाठी, तेल वेगळे करण्यासाठी आणि जहाजावरील साठवण टाक्यांमध्ये साठवण्यासाठी डिझाईन केले आहे.

Samudra Pratap Ship Launch: भारतीय तटरक्षक दलाची ताकद वाढणार, ‘समुद्र प्रताप’चे जलावतरण; संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ
CM Pramod Sawant Interview: मंत्रिमंडळ फेरबदल गणेशचतुर्थीनंतरच; गोमन्तक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री सावंत स्पष्टच बोलले

संजय सेठ, संरक्षण राज्य मंत्री

हा प्रकल्प केवळ संपूर्ण देशासाठी प्रतिष्ठेचा आहे. हा प्रकल्प शिपयार्डसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत प्रदूषण नियंत्रण जहाजे बांधण्यासाठी एक पायरी आहे जी नजीकच्या भविष्यात तेलगळतीचे ऑपरेशन्स करेल. आज या जहाजाचे लोकार्पण हे आत्मनिर्भर भारत आणि सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाच्या दिशेने आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com